Saturday, August 9, 2025
Homeइचलकरंजीहुपरी परिसर पुन्हा हादरला; तळंदगे येथे पुरलेले अर्भक आढळून आल्याने खळबळ

हुपरी परिसर पुन्हा हादरला; तळंदगे येथे पुरलेले अर्भक आढळून आल्याने खळबळ

कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी परिसर पुन्हा एकदा धक्कादायक घटनेमुळे हादरला आहे. तळंदगे गावातील एमआयडीसी रस्त्यालगत असणाऱ्या फडतारे यांच्या उसाच्या शेतात दोन ते तीन महिन्याचे अर्भक पुरलेल्या अवस्थेत आढळून आला.

 

या अमानुष घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

शेतमालक धोंडिबा फडतारे हेआपल्या शेतात गेले असता, जमिनीत काहीतरी पुरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ पोलीस पाटील यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच हुपरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

 

पोलिसांची घटनास्थळी धाव

 

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. अपर तहसीलदार महेश खिलारे, पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे, तसेच डॉक्टरांच्या उपस्थितीत प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. फॉरेन्सिक लॅबला देखील पाचारण करण्यात आले.

 

अनैतिक संबंध किंवा गर्भलिंग तपासणीचा संशय

 

घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये या अर्भकाचा मृत्यू अनैतिक संबंधातून झाल्याची किंवा गर्भलिंग तपासणी करून हे अर्भक पुरण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास पोलीस अधिक तपशीलवारपणे करत आहेत. अर्भक कुणाचे आहे, तसेच मृत्यूचे नेमके कारण काय, याचा शोध पोलीस घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -