करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी श्री अंबाबाई देवीचे मूळ मूर्तीचे दर्शन सोमवार ११ पासून ते मंगळ १२ ऑगस्टपर्यंत भाविकांना घेता येणार नाही, या कालावधीमध्ये भाविकांना श्रीं ची मूर्ती दर्शनासाठी ठेवणेत येणार असून भाविकांनी पितळी बाहेरुन श्रीकलश व श्रींच्या उत्सवमूर्तीचे दर्शन मिळणार आहे.
देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांना सहकार्य करावे, असे आवाहन सचिव
नाईकवाडे यांनी केले आहे. श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी श्री अंबाबाई देवीची मूर्ती सुस्थितीत राहणेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कोल्हापूर तथा प्रशासक देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरची पाहणी करणेकामी
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नवी दिल्ली (भारत सरकार) आले होते. त्यानुसार भारतीय पुरातत् सर्वेक्षण नवी दिल्ली यांचेकडून सदर मूर्तीची पाहणी संवर्धन १६ एप्रिल २०२४ मध्ये करणेत आली
होती.
त्यावेळेच्या सुचनेनुसार देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांचे वतीने पत्र दि. १२जून रोजी महासंचालक भारतीय पुरातत्व विभाग नवी दिल्ली (भारत सरकार) यांना मूर्ती नियमित पाणी आवश्यक संवर्धन प्रक्रिया होते. त्यानुसार भारतीय पुरातत्व विभाग यांचे बने श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी आवश्यक नियमित संवर्धन प्रक्रिया सोमवार ता. ११ पासून ते २२ ऑगस्ट अखेर करणेत येणार आहे. त्यामुळे श्री अंबाबाई देवीचे मूळ मूर्तीचे दर्शन सोमवारी व मंगळवारी होणार नाही असे सचिव नाईकवाडे यांनी सांगितले



