आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणात अनेक मोठे बदल होताना दिसत आहेत. अनेक नेते, पदाधिकारी पक्षाची साथ सोडत आहेत. भाजपने या निवडणुकीपूर्वी जोरदार तयारी सुरू केली असून अनेक पक्षाची नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत
अशामध्ये आता भाजपलाच मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर दौऱ्यावर असतानाच एका बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली आहे.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यानच भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे शक्तीबुथ केंद्र प्रमुख आणि उपाध्यक्ष हेमंत जाधव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. हेमंत जाधव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओद्वारे त्यांनी पक्षाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे सांगत पदाचा राजीनामा दिला. भारतीय जनता पार्टीमध्ये काम करताना कुठलेही काम होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
हेमंत जाधव म्हणता की, ‘मी सर्वांना सांगू इच्छितो की मी इथून पुढे भारतीय जनता पार्टीचा सक्रीय कार्यकर्ता म्हणून काम करणार नाही. याची कारणं बरीच आहेत आणि याचा मी बऱ्याचदा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये मला कधीही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. वैयक्तिक कारणासाठी अजिबात नाही. ज्या कारणासाठी मी भाजपसोबत काम करत होतो. पार्टी त्यापैकी कुठलंही काम करायला तयार नाही. त्यामुळेच मी या पदाचा राजीनामा देत भाजपसोबत काम करायचे नाही हे जाहीर करत आहे.’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर दौऱ्यावर आहेत. थोड्या वेळापूर्वीच ते लातूर विमानतळावर दाखल झाले. पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले धनंजय मुंडे, आमदार रमेश कराड यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या हसते लातूर जिल्हा परिषद प्रांगणातील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्याचसोबत ते आज लातूर जिल्हा विकास कामांसंदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. शासकीय विश्रामगृह ही बैठक होणार आहे.