Sunday, August 24, 2025
Homeक्रीडासूर्यकुमार यादवला मोठा झटका, आशिया कपआधी टी 20i कॅप्टनसोबत काय झालं?

सूर्यकुमार यादवला मोठा झटका, आशिया कपआधी टी 20i कॅप्टनसोबत काय झालं?

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी सहभागी 8 संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. ही स्पर्धा यंदा टी 20 फॉर्मेटने होणार आहे. गतविजेत्या टीम इंडियासमोर यंदाही आशिया चॅम्पियन होण्याचं आव्हान असणार आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. रोहित शर्मा याने 2024 मधील वर्ल्ड कप विजयानंतर टी 20i क्रिकेटला अलविदा केला. त्यानंतर सूर्यकुमारला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. सूर्याने तेव्हापासून कर्णधार आणि फलंदाज म्हणून अप्रतिम कामगिरी केली आहे. तर आता सूर्या आशिया कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागला आहे.या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी सूर्याला मोठा झटका लागला आहे.

 

ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर टीम डेव्हिड याने सूर्यकुमार यादव याचा महारेकॉर्ड ब्रेक केला आहे. डेव्हीडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यातील पहिल्या डावात स्फोटक खेळी केली. डेव्हीडने 52 बॉलमध्ये 8 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 83 धावा केल्या. डेव्हिडने 159.62 च्या स्ट्राईक रेटने या धावा ठोकल्या. डेव्हीडच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 179 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र दक्षिण आफ्रिकेला 161 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाने यासह 17 धावांनी हा सामना जिंकला. कांगारुंनी यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

 

डेव्हीडने या 83 धावांच्या खेळीसह सूर्यकुमारचा रेकॉर्ड ब्रेक केला. तसेच डेव्हीडची टी 20i कारकीर्दीतील एका डावात सर्वाधिक चेंडू खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरली. डेव्हिडने याआधी 2020 साली हाँगकाँग विरुद्ध 46 चेंडूचा सामना केला होता.

 

टीम डेव्हीडकडून सूर्यकुमार यादवचा महारेकॉर्ड ब्रेक

डेव्हिडने टी 20i क्रिकेटमध्ये सर्वोत्तम स्ट्राईक रेटबाबत सूर्यकुमारचा महारेकॉर्ड ब्रेक केला आहे. डेव्हिडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी 20i नंतर सूर्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. सूर्याचा टी 20i करियरमधील स्ट्राईक रेट हा 167.07 असा आहे. तर आता डेव्हिडचा सुधारित स्ट्राईक रेट हा 167.37 असा झाला आहे.

 

टीम डेव्हिड मॅन ऑफ द मॅच

दरम्यान डेव्हिड ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा नायक ठरला. डेव्हीडला त्याने केलेल्या या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. आता उभयसंघातील दुसरा आणि निर्णायक सामना हा मंगळवारी 12 ऑगस्टला होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -