Sunday, August 24, 2025
Homeमहाराष्ट्रडोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ ठरणार फेल, भारत 50 देशांच्या मदतीने करणार अमेरिकेचा...

डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ ठरणार फेल, भारत 50 देशांच्या मदतीने करणार अमेरिकेचा गेम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दणका देत 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. भारतावर लावलेला हा 50 टक्के कर इतर कोणत्याही देशांवर लादलेल्या सर्वाधिक करांपैकी एक आहे. हा कर दोन टप्यात लादण्यात आला आहे. यातील 25 टक्के कर आधीच लागू करण्यात आला आहे, तर उर्वरित 25 टक्के कर 28 ऑगस्टपासून लागू होणार आहे.

 

भारत 50 देशांच्या मदतीने अमेरिकेला दणका देणार

अमेरिकेच्या या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक पावले उचलणार असल्याचे संकेत दिले आहेत. आम्ही देशाच्या हितासाठी योग्य निर्णय घेणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे. भारताने ट्रम्पच्या निर्णयाला धक्का देण्यासाठी कर लादण्याचा निर्णय अयशस्वी करण्यासाठी भारताने नवीन नियोजन सुरू केले आहे. भारत आता 50 देशांच्या मदतीने अमेरिकेला दणका देणार असल्याचे समोर आले आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

 

आफ्रिका आणि मध्य पूर्वेवर फोकस

भारत आता अमेरिकेऐवजी इतर देशांमध्ये आपली निर्यात वाढवण्याच्या तयारीत आहे. यामध्ये पश्चिम आशिया, आखाती देश आणि आफ्रिकेतील 50 देशांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. अमेरिकेने भारतीय वस्तूंवर कर लादल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सरकार आता 50 देशांवर लक्ष केंद्रित करत आहे, या देशांमध्ये भारताच्या एकूण निर्यातीपैकी सुमारे 90 टक्के निर्यात केली जाते. आता ही निर्यात आणखी वाढवली जाणार आहे. वाणिज्य मंत्रालय यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

 

युरोपियन देश आणि ब्रिटनशी करार

भारताने काही दिवसांपूर्वी ब्रिटनसोबत मुक्त व्यापार करार केला आहे. ज्यामुळे भारताची निर्यात आणखी वाढणार आहे. यामुळे ब्रिटन आणि भारतामधील करारामुळे व्यापार 120 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. तसेच भारताचा युरोपसोबतचा व्यापार करारही अंतिम टप्प्यात आहे. आइसलँड, लिकटेंस्टाईन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंडसह इतरही देशांसोबत करार केला जाणार आहे. हा करार ऑक्टोबरपासून लागू होण्याची अपेक्षा आहे. यामुळे अमेरिकेकडून भारताला होणारे नुकसान या 50 देशांसोबतच्या व्यापारातून भरून काढले जाण्याची शक्यता आहे. यामुळे अमेरिकेचा भारतावर 50 टक्के कर लावण्याचा निर्णय फसण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -