Sunday, August 24, 2025
Homeमहाराष्ट्रतारक मेहता का उलटा चश्मा'च्या चाहत्यांसाठी खुशखबर! दया भाभी परत येणार? असित...

तारक मेहता का उलटा चश्मा’च्या चाहत्यांसाठी खुशखबर! दया भाभी परत येणार? असित मोदींसोबतच्या फोटोमुळे चर्चा

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेने लोकप्रियतेचे अनेक उच्चांक गाठले आहेत. अलीकडेच मालिकेला 17 वर्षे पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशनही केले होते. या मालिकेच्या सुरुवातीच्या प्रवासापासून आतापर्यंत अनेक बदल झाले आहेत.

 

अनेक कलाकार मालिका सोडून गेले आहेत. तर अनेकांनी या जगाचा निरोप घेतला आहे.

 

पण या मालिकेतील एका कलाकाराची मात्र चाहते आणि निर्माते अगदी आवर्जून वाट पहात आहेत. हा कलाकार म्हणजे दयाभाभी.

 

अभिनेत्री दिशा वाकानीने ही व्यक्तिरेखा अशी उत्तम पद्धतीने वठवली आहे की ती मालिकेपासून इतकी लांब असूनही तिच्या जागी निर्मात्यांनी कुणाची निवड केलेली नाही.

 

मुलींच्या जन्मानंतर दिशाने संगोपनाचा पर्याय निवडला आणि मालिकेतून ब्रेक घेतला. मालिकेचे निर्माते अनेकदा विनंती करूनही दिशाने परत येण्याबाबत ठोस निर्णय दिला नाही.

 

पण नुकतेच मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी दिशा हिच्या घरी भेट दिली. रक्षाबंधनाचे औचित्य साधत असित यांनी ही भेट दिली. त्यांनी या भेटीचे फोटो आणि व्हीडियो सोशल मीडियावर शेयर केले.

 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात, ‘ काही नाती नशिबाने आकार घेतात. ही नाती रक्ताची नसली तर मनापासून जोडलेली असतात.दिशा वाकानी फक्त दयाभाभी नाही तर माझी बहीण आहे.अनेक वर्ष आनंद आणि आपलेपणा वाटणारे हे नाते स्क्रीनच्या सहवासापेक्षा पुढे गेले आहे. या राखीवर हे आपलेपण पुन्हा जाणवले. हे नाते आपला गोडवा असाच कायम ठेवो.’

 

यासोबतच असित यांनी काही फोटो आणि व्हीडियोही शेयर केले आहेत. यामध्ये दिशा राखी बांधताना आणि असित यांच्या पाया पडतानाही दिसते आहे. असित यांची ही पोस्ट पाहून कमेंटमध्ये चाहते दिशाने मालिकेत परत यावे अशी मागणी करत आहेत.

 

2017 पासून दिशा नाही मालिकेत

 

दिशाने 2017 मध्ये मालिकेतून ब्रेक घेतला होता. तेव्हापासून ती मालिकेत परत आलेली नाही. अनेकदा ती परत येणार अशी बातमी समोर येते पण त्याबाबत कोणतीही ऑफिशियल घोषणा केली जात नाही. याशिवाय दयाला मालिकेत रिप्लेस केले जाणार अशी चर्चाही बरेचदा होताना दिसते. पण निर्माते मात्र दिशाला परत आणण्याच्या भूमिकेत ठाम असल्याचे समोर येते आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -