अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या विरोधात गरळ ओकताना दिसत आहेत. भारतावर थेट टॅरिफ लावण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. हेच नाही तर पाकिस्तानच्या आढून थेट भारताचा गेम करण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केला जातोय.
भारताकडून अमेरिकेला आणि पाकिस्तानला जोरदार प्रतिउत्तर दिले जातंय. ट्रम्प कधी भारताला टॅरिफ किंग म्हणतात तर कधी ‘डेड इकोनॉमी. आता तर थे पाकिस्तानच्या आढून धमकी दिली जात आहे. मात्र, भारताकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आलंय की, काहीही झाले तरीही अमेरिकेच्या दबावाला बळी पडणार नाही.
हेच नाही तर अनेक अमेरिकन कंंपन्या या भारतात येऊन आपला व्यवसाय करत आहेत. भारताने जर कठोर पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला तर डेड इकोनॉमी होण्याची वेळ थेट अमेरिकेवर येऊ शकते. कोट्यावधीपेक्षाही जास्त रूपयांची उलाढाल अमेरिकन कंपन्या या भारतात करतात जर भारताने कठोर निर्णय घेण्यास सुरूवात केली तर अमेरिकन कंपन्यांना जोरदार फटका बसू शकतो. भारत आता अमेरिकन कंपन्यांवर कारवाईच्या तयारीत असल्याचे सांगितले जातंय. भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) आहे.
2024-25 या आर्थिक वर्षात भारत आणि अमेरिका यांच्यातील एकूण द्विपक्षीय व्यापार निर्यात आणि आयात 131.84 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका होता. भारतात अमेरिकेचे अनेक मोठ्या कंपन्या आहेत, ज्या भारतीय बाजारपेठेत मोठा व्यापार करतात. पण त्यापैकी 30 कंपन्या अशा आहेत, ज्याच्याविरोधात जर भारताने कारवाई केली तर त्याचा थेट परिणाम हा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होईल शकतो. चला तर मग जाणून घ्या या कंपन्या कोणत्या आहेत.
Amazon India: ही एक अमेरिकन कंपनी ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठी आहे. ही कंपनी भारतीय बाजारपेठेतून मोठा पैसा कमावते आणि कंपनीचे जे उत्पन्न आहे ते अमेरिकेपर्यंत पोहोचते.
Google (Alphabet Inc.) : ही अमेरिकन कंपनी असून सर्च इंजिन, जाहिराती, अँड्रॉइड आणि क्लाउड सेवा पुरवते, सर्वांना गुगलबद्दल माहिती आहे आणि ते वापरले जाते. गुगलसाठी भारत महत्वाचे अजून मोठ्या प्रमाणात त्यांना टाडा मिळतो.
Apple Inc: आयफोनसाठी भारतीय बाजारपेठ अत्यंत महत्वाची आहे. भारतामध्ये जवळपास अनेक लोक आयफोनचा वापर करतात. आयफोनला बनवणारी कंपनी अमेरिकन आहे. ही कंपनी मोठ्या प्रमाणात आयफोन प्रोडक्शन करते आणि विक्री करते.
Microsoft: या कंपनीचा भारतातील व्यवसाय सॉफ्टवेअर, क्लाउड (अॅझ्युर) आणि आयटी सेवांमध्ये पसरलेला आहे. ही कंपनी मोठ्या प्रमाणात भारतात कमाई करते.
X and Meta : भारतीय लोक मोठ्या संख्येने एक्स आणि फेसबुकला वापर करतात. या कंपनीचे भारतात मोठे मार्केट आहे. एक्स आणि फेसबुकची कंपनी देखील अमेरिकन आहे.
Coca-Cola India : भारतामध्ये कोकाकोलाचे मोठे मार्केट आहे. ही कंपनी शितपेय भारतात मोठ्या प्रमाणात विकते. हेच नाही तर 1960 पासून या कंपनीच्या भारतात कारभार आहे.
Colgate-Palmolive (India) Ltd: सकाळी उठले की, आपल्या दिवसाची सुरूवात ही कोलगेटने होते. ही कोलगेट कंपनी अमेरिकन आहे. फक्त कोलगेटच नाही तर अनेक प्रोडक्ट ही कंपनी भारतात सेल करते.
Nestlé India Limited : ही कंपनी अमेरिकन आहे आणि भारतात हिचा मोठा व्यापार असून मॅगीपासून ते चॉकलेटपर्यंत अनेक वस्तू ही कंपनी भारतात सेल करते.
J.M. Smucker Company (India) Pvt. Ltd : ही कंपनी जॅम, पीनट बटर आणि स्वयंपाक घरातील अनेक वस्तू भारतात विक्रि करते. या कंपनीचे भारतात मोठे मार्केट आहे.
Domino’s Pizza & Pizza Hut: या दोन्ही कंपन्या या अमेरिकन आहेत. भारतात यांचे मोठे मार्केट असून अनेक शहरांमध्ये या मोठी उलाढाल करतात.
यासोबतच भारतात अशा अजून 30 अमेरिकन कंपन्या आहेत. ज्या मोठा पैसा कमावतात आणि तो पैसा अमेरिकेपर्यंत जातो. या कंपन्यांविरोधात भारताने जर पाऊले उचलली तर याचा थेट परिणाम अमेरिकेवर होऊ शकतो.