Sunday, August 24, 2025
Homeब्रेकिंगमौजमजेसाठी मित्राच्या घरातच केली चोरी; पोलिसी खाक्या दाखवताच दिली कबुली

मौजमजेसाठी मित्राच्या घरातच केली चोरी; पोलिसी खाक्या दाखवताच दिली कबुली

वेषांतर करून जिवलग मित्राच्याच घरात चोरी करून मित्राचा विश्वासघात केल्याची घटना समोर आली आहे. केवळ मौजमजेसाठी मित्राच्या घरात चोरी करून संशयिताने सुमारे साडेचार लाखांच्या दोन सोन्याच्या चैन चोरून नेल्या.

 

ही घटना रविवारी (दि.१०) रात्री दोनच्या सुमारास राजुर येथील राहुलनगर येथे घडली. दरम्यान राजुर पोलिसांनी तातडीने तपास करत संशयित मित्राला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला. सागर दिगंबर पवार (रा. राजूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी, विष्णु रामभाऊ हेकरे (वय ६०.राहुलनगर, राजुर) हे रविवारी रात्री आपल्या घरात झोपले असताना रात्री दोनच्या सुमारास एका आनोळख्या व्यक्तीने घराचा दरवाजा ठोठावला. त्यांनी दार उघडताच त्यांना तोंडाला कापड बांधलेली एक व्यक्ती दिसून आली. एका व्यक्तीने त्यांना मारहाण करत त्यांना सयंपाक घरापर्यंत नेले. त्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील साडेचार लाखाच्या दोन सोन्याच्या चैन हिसकावून तो पळून गेला. त्यानंतर विष्णु हेकरे यांनी राजूर पोलिसांत धाव घेत या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उप अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांनी तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयाची सोई विष्णु हेकरे यांच्या मित्राकडे फिरत असल्याने पोलिसांनी हेकरे यांचा मित्र सागर पवार याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून ४ लाख ३९ हजार ९२३ रूपयांच्या दोन सोन्याच्या चैन हस्तगत करत पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तपास पोलीस उपनिरीक्षक विलास माळोदे हे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -