देशात महिलांची सुरक्षा हा कायमच कळीचा मुद्दा राहिलेला आहे. प्रत्येक तासाला देशातील कोणत्यातरी कोपऱ्यातून महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येतात. विनयभंग, बलात्कार तसेच अन्य घटना घडत असतात. काही ठिकाणी तर भर रस्त्यात महिलांसोबत धक्कादायक कृत्य केले जाते. असाच एक अचंबित करणारा आणि चीड आणणारा प्रकार एका मॉडेलसोबत घडला आहे. नवी दिल्लीतील गुरुग्राममध्ये एका मॉडेल आणि कन्टेंट क्रिएटरसमोर एका तरुणाने घाणेरडे कृत्य केले आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून त्या तरुणावर कठोरातील कठोर कारवाई कारवी, अशी मागणी केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार घडलेली ही घटना नवी दिल्लीतील गुरुग्राम येथील आहे. इथे एका मॉडेलचा एका प्रकारे लैंगिक छळ करण्यात आला आहे. गुरुग्रामच्या परिसरात ती कॅबची वाट पाहात उभी असतान तिच्यासोबत हा प्रकार घडला आहे. 4 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून ती आता समोर आली आहे. ती जयपूरवरून घरी परतत होती. त्याच वेळी माथेफिरू तरुणाने तिच्यासोबत अत्यंत घृणास्पद कृत्य केले. हा सर्व प्रकार तिने तिच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे.
पोलिसांना कॉल केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही
तरुणीसोबत ही घटना घडत असतानाच तिने पोलीस तसेच महिलांसाठी असलेल्या आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला. मात्र तिला कोणीही प्रतिसाद दिलेला नाही. हा सर्व प्रकार नंतर तिने सोशल मीडियावर शेअर केला. पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचल्यानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
तरुणाने नेमकं काय कृत्य केलं?
तरुणीनेच सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार 2 ऑगस्ट रोजी तरुणी गुरुग्राममधील राजीव चौकात आली होती. तिथून कॅबद्वारे ती तिच्या घरी जाणार होती. मात्र त्याच वेळी एक तरुण समोर बॅग लटकून तिच्याकडे आला. तो तिच्या आजूबाजूने फिरू लागला. तो सतत तिच्याकडे पाहात होता. सुरुवातीला तिने त्या तरुणाकडे दुर्लक्ष केले. पण नंतर तो भर रस्त्यात तिच्यासमोरच हस्तमैथून करत होता. त्यानंतर हा सर्व प्रकार तिने आपल्या मोबाईल्या माध्यमातून रेकॉर्ड करून सोशल मीडियावर हा अनुभव शेअर केला.
दरम्यान पोलिसांनी आता या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलीस त्या भागातील सर्व सीसीटीव्ही तपासत आहेत. पोलीस आता लवकरच याबाबत मोठी कारवाईची तयारी करणार आहेत.