Monday, August 25, 2025
Homeमहाराष्ट्रअमेरिकेसोबत तणाव सुरू असतानाच नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत…

अमेरिकेसोबत तणाव सुरू असतानाच नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत…

टॅरिफच्या प्रश्नावरून भारत आणि अमेरिकेमधील संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेने मोठा टॅरिफ भारतावर लादला आहे. ज्याचा परिणाम थेट भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. भारत देखील अमेरिकेच्या विरोधात कडक भूमिका घेत आहे. मात्र, अमेरिकेकडून पाकिस्तानच्या माध्यमातून भारताला मोठी धमकी दिली जात आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दाैऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळतंय. यावेळी व्यापार करार आणि टॅरिफच्या मुद्दावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.

 

नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या दाैऱ्यावर असतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा देखील होईल. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा मुख्य उद्देश संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सहभागी होणे आहे. नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सहभागी होणार आहेत. टॅरिफच्या वादानंतर या बैठकीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संयुक्त राष्ट्रांची सर्वसाधारण सभा आहे.

 

या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेत असतील, संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या बाजूला पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बैठक होईल.दोन्ही देशांमधील व्यापारविषयक समस्या सोडवण्यासाठी आणि शुल्काबाबत एक समान करार करण्यासाठी चर्चा होईल. पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेच्या या दाैऱ्याला अधिक महत्व प्राप्त आहे. कारण मागील काही दिवस भारत आणि अमेरिकेत टॅरिफवरून एक वाद सुरू झाल्याचे बघायला मिळतंय.

 

अमेरिकेकडून इतर देशांच्या तुलनेत भारतावर मोठा टॅरिफ लावण्यात आलाय. फक्त हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प हे भारताबद्दल चुकीची विधाने करताना दिसत आहेत. अमेरिकेकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ हा लावण्यात आलाय. सध्या 25 टक्के लागू आहे, तर काही दिवसांत अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लागू केला जाईल. भारताने अमेरिकेच्या टॅरिफला विरोध केला आहे आणि तो अन्याय असल्याचे म्हटले आहे. मुळात म्हणजे भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो, हीच मोठी समस्या डोनाल्ड ट्रम्प यांची आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -