Sunday, August 24, 2025
Homeब्रेकिंगगणेशोत्सव काळात DJ वर निर्बंध; नियम तोडल्यास होईल कारवाई

गणेशोत्सव काळात DJ वर निर्बंध; नियम तोडल्यास होईल कारवाई

हिंदू धर्मियांचा महत्वाचा असलेला गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या २७ ऑगस्टला अगदी थाटामाटात गणपती बाप्पाचे स्वागत होईल. गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर प्रत्येकाच्या घरांमध्ये लगबग सुरु आहे. महाराष्ट्राचा विचार करायचं झाल्यास, शहरी भागात गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विशेष म्हणजे पुणे आणि मुंबईत मोठ्या धूमधडक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. पुण्यातील कसबा गणपती,दगडूशेठ गणपती,खजिना गणपत, केशरीवाडा गणपती तर मुंबईतील लालबाग गणपती मंडळ, दादर गणपती मंडळ,गिरगाव गणपती मंडळ या प्रमुख मंडळाकडे गणपतीचे आगमन झाले आहे. यानिमित्ताने पोलीस प्रशासन देखील सज्ज्य झाले आहे. याच दरम्यान, मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर उलट आहे. मुंबईत गणेशोत्सवात काळात डीजे वाजवण्यावर उच्य न्यायालयाने बंदी घातली आहे. तरीही कुठे डिजे वाजवल्याचे आढळून आलं तर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.

 

काय आहे उच्य न्यायालयाची नियमावली? Ganeshotsav 2025

उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाबाबत कडक नियम लागू केले आहेत.त्यामध्ये रात्री 10 वाजल्यानंतर 50 डेसिबलपेक्षा जास्त ध्वनी पातळी ओलांडता येणार नाही . सकाळी 6 वाजेपूर्वी डीजे वाजवणे हे बेकायदेशीर कृत्य समजले जाईल. जर कोणी हा नियम तोडला तर त्यांच्यावर पोलिस किंवा स्थानिक प्रशासन त्वरित कारवाई करू शकते. कोणाकडून उल्लंघन झाल्यास मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. किंवा उपकरणे जप्तीचा इशारा देण्यात आला येईल. डीजे वापरण्यापूर्वी स्थानिक पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागेल. ध्वनी मर्यादा हि (दिवसा 55 डेसिबल, रात्री 45 डेसिबल) असेल.

 

नियम तोडणाऱ्यांना आर्थिक दंड किती असेल?

जर कोणत्या मंडळाने ध्वनी प्रदूषणाचा नियम जर मोडला तर ध्वनी प्रदूषण नियम, 2000 या कायदा अंतर्गत, रात्री 10 वाजेनंतर डीजे वाजवल्यास दंड आकारला जाऊ शकतो. रक्कम मात्र उल्लंघनाच्या स्वरूपावर अवलंबून असते, परंतु सामान्यतः दंड हा हजारों रुपयांपासून सुरू होतो. किंवा मुंबई पोलिसांना डीजे उपकरणे, जसे की साउंड सिस्टम, मिक्सर, आणि लाऊडस्पीकर जप्त करण्याचा अधिकार आहे. अशा घटना गणेशोत्सव (Ganeshotsav 2025) सणांदरम्यान वारंवार घडतात.जर पोलिसांनी कायदेशीर प्रकरण नोंदणी करून कार्यवाही केली तर भारतीय दंड संहिता (BNS) किंवा पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. यामुळे तुरुंगवास किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते. तसेच गणेश मंडळांवर कारवाई देखील कारवाई होऊ शकते… गणेशोत्सवासारख्या उत्सवांमध्ये डीजे जर बंदीचं उल्लंघन झाल्यास गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई होऊ शकते, ज्यात मंडपाचा परवाना रद्द होणे किंवा मंडपावरील इतर निर्बंधांचा समावेश आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -