हुपरीत दोघांवर जीवघेणा हलना करण्यात आला. यामध्ये सोहेव मुल्ला व रोहीत मोडेकर हे गंभीर जखमी असून मारेकऱ्यांकडून त्यांच्यावर एडक्याने वार करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच हुपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. हुपरी पोलिस ठाण्यात पा घटनेची नोंद करण्याचे काम रात्री
उशिरापर्यंत सुरू होते. ही घटना हुपरी रेंदाळ
बायपास रोडवर घडली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आरोपी प्रतिक
गाट, आदित्य गाट (दोघे रा. गणेश माळ, हुपरी व त्यांचे साथीदार हातात एडका नाचवत गोठ्याच्या शेडमध्ये प्रवेश करीत बेसावध असलेल्या सोहेब मुल्ला व रोहित मोडेकर (दोघे रा. परी) यांच्या वर अचानक हल्ला केला. यात रोहित
याच्या डोक्यात एडक्याने दोन वीं बार करण्यात आले. सोहेब याच्या डाव्या हाताची बोटे तुटलो. जखमी अवस्थेत मुल्ला बाने प्रतिक गाट व अनिकेत गाट या दोघांना पकडून ठेवले होते. यातून एकच गोंधळ उडाला. प्रचंड रहदारीच्या रस्त्याया तुंबळ हाणामारी सुरू होती. घटनेची माहिती मिळताच पो.कॉ. संदेश शेटे, साताप्पा चव्हाण, होमगार्ड किरण पोवार यांनी धाव घेतली परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आरोपीच्या
गंभीर जखमी असलेल्या रोहित हातातील धारदार एडका काढून घेतला. बामुळे पुढील अनर्थ टळला. जखमी वर खासगी दवाखान्यात उपचार सुरु होते. बाला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले. पाच महिन्यांपूर्वी सोहेब मुल्ला व साथीदारांनी हल्लेखोराच्या घरावर दगडफेक करीत खिडकीच्या काचा फोडल्या होत्या, त्याचा राग मनात धरून हा हल्ला झाल्याचे घटनास्थळी बोलले जात होते. वारंवार या दोन गटात वर्चस्व वादातून तुंबळ हाणमारीचे प्रकार पडले आहेत. याबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरु होते.