79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये असणाऱ्या(red fort) लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण समारंभ पार पडणार आहे. यंदाचा स्वातंत्र्यदिन अनेक कारणांनी खास आहे. त्यापैकीच एक कारण म्हणजे लाल किल्ल्यावर करण्यात आलेली जैय्यत तयारी.
बदलत्या तंत्रज्ञानाची साथ घेत लाल किल्ल्यावर यंदा पहिल्यांदाच सुरक्षिततेसाठी उच्चस्तरिय व्यवस्था करण्यात आल्या आहेत. ज्यासाठी तब्बल 80 पथकं सक्रिय असतील असं म्हटलं जात आहे. लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिन आणि त्यानिमित्त आयोजित सोहळ्यांच्या धर्तीवर ड्रोन डिटेक्शन सिस्टीम बसवली जाणार असून, थेट AI नं टेहळणी केली जाणार आहे. इतकंच नव्हे, तर फेस डिटेक्शनच्या माध्यमातून या परिसरातील (red fort) गुन्हेगारांचीसुद्धा खैर नसल्याचं सांगण्यात येत आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील या संवेदनशील भागाला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं असून, सध्याच्या घडीला तिथं 10 हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनाच असून, वाहतूक नियंत्रणासाठी 3 हजार ट्रॅफीक पोलीस तैनात ठेवण्यात आले आहेत. याशिवाय अंडर व्हेईकल सर्विलान्स सिस्टीमसुद्धा बसवण्यात आली आहे.
सीसीटीव्हीची प्रत्येकावर नजर
लाल किल्ल्यावरील या सोहळ्याच्या धर्तीवर प्रत्यजे हालचालीवर सीसीटीव्हीची नजर असेल आणि याच CCTV च्या माध्यमातून हेड काऊंटही केलं जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी इथं संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून, तर गाडीतील बॅाम्ब किंवा स्फोटक ओळखता यावे यासाठी अंडर व्हेईकल सर्विलान्स सिस्टीम बसवण्यात आली आहे.
NSG कमांडोवर जबाबदारी…
एनएसजी कमांडो, स्वाट टीन, पॅरामिलिटरी फोर्सच्या विशेष जवानांनी लाल किल्ला आणि परिसरातील सुरक्षेची धुरा आपल्या हाती घेतली असून, उर्वरित दिल्लीमध्ये स्थानिक पोलीस यंत्रणा सुरक्षा व्यवस्था पाहताना दिसेल. प्रामुख्यानं थेट लाल किल्ल्याशी जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यापासून मेट्रो मार्गावरही सुरक्षा यंत्रणाची करडी नजर असणार आहे. इतकंच नव्हे, तर या नजीकच्या भागांतील 300 इमारतींवर छत बसवम्यात आलं असून, कोणत्याही संशयास्पदस हालचालीवर लक्ष ठेवत वेळीच ती समूळ नष्ट करण्यावर यंत्रणांचा भर असेल.
79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर कोणता मुख्य कार्यक्रम होणार आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण समारंभ पार पडणार आहे.
यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या तयारीत काय खास आहे?
यंदा लाल किल्ल्यावर उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था, ड्रोन डिटेक्शन सिस्टीम, AI-आधारित टेहळणी आणि फेस डिटेक्शन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
लाल किल्ल्याच्या सुरक्षेसाठी किती पथकं तैनात आहेत?
सुरक्षेसाठी तब्बल 80 पथके सक्रिय असतील.
कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर सुरक्षेसाठी केला जात आहे?
ड्रोन डिटेक्शन सिस्टीम, फेस डिटेक्शन, अंडर व्हेईकल सर्व्हिलन्स सिस्टीम आणि CCTV यांचा वापर केला जात आहे
हेही वाचा :