Sunday, August 24, 2025
Homeब्रेकिंगचोरांना पकडण्यासाठी घरमालकाने चक्क मांत्रिकालाच बोलावलं! लिंबू, मिरची अन् नारळ ठेऊन खेळ...

चोरांना पकडण्यासाठी घरमालकाने चक्क मांत्रिकालाच बोलावलं! लिंबू, मिरची अन् नारळ ठेऊन खेळ सुरु केला अन् घडलं भयंकर..

नांदेडमध्ये एक धक्कादायक घडल्याने खळबळ माजली आहे. येथील एका घरात चोरीची घटना घडली. पण घरमालकाने पोलिसांना बोलवण्याऐवजी चक्क मांत्रिकालाच बोलावलं. त्यानंतर मांत्रिकाने जे केलं, ते पाहून गावातील लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

 

याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांविरोधात जादू-टोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

 

चोरी झाली अन् मांत्रिकाला बोलावलं..

 

जुलै रोजी रामा अरोटे नावाच्या व्यक्तीच्या घरी चोरीची घटना घडली होती. पण त्यांनी पोलिसांना तक्रार दाखल करण्याऐवजी भलतंच केलं. 11 ऑगस्टला धर्माबाद तालुक्याच्या जरीकोट गावात राहणारा मांत्रिक गंगाराम कादरीला बोलावलं.

 

मंदिराच्या समोर अंधश्रद्धेचा खेळ

 

गावात पोहोचल्यानंतर मांत्रिकाने चोरीच्या संशयाप्रकरणी 6 लोकांना अटक केली आहे. यामध्ये परमेश्वर राठोड आणि 5 अन्य लोकांचा समावेश होता. या सर्वांना गावातील हनुमान मंदिरासमोर आणण्यात आलं. त्यानंतर मांत्रिकने मंदिरासमोर लिंबू, मिरची आणि नारळ ठेवून मांत्रिक खेळ सुरु केला. मांत्रिकाने सर्व संशयितांना एका पाण्याच्या टाकीत बुडवलं. त्यानंतर त्यांना भात आणि पानात ठेवलेल्या गोष्टी खायला दिल्या. गावातील लोक हे सर्व पाहून थक्कच झाले.

 

पोलिसांना खबर मिळाली अन् नंतर..

 

जेव्हा हा धक्कादायक प्रकार सुरु होता. तेव्हा पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. वानाले नावाच्या व्यक्तीनं हा सर्व प्रकार मोबाईलच्या कॅमेरात कैद केला अन् याचा व्हिडीओ पोलिसांना पाठवला. व्हिडीओ समोर येताच 4 लोकांवर जादू-टोण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

 

पोलिसांनी काय म्हटलं?

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीची घटना झाली होती. पण तक्रार दाखल करण्याऐवजी मांत्रिकाला बोलावून 5-6 लोकांवर संशय व्यक्त केला. त्यांच्यासोबत चुकीचं वर्तन केलं. आरोपींनी लोकांना कपड्यांसह थंड पाण्यात बुडवलं. याप्रकरणी चार लोकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -