भारतीय हवामान खात्यानं 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्टदरम्यान महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.ईशान्य अरबी समुद्र आणि त्याच्या लगतच्या दक्षिण गुजरात, कोकण आणि गोव्यामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
16 ते 18 ऑगस्ट दरम्यान कोकण आणि गोव्यातील काही ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 17 ऑगस्ट आणि 18 ऑगस्टला महाराष्ट्रात अतिशय जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसंच 18 ऑगस्टला गुजरातमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील 7 दिवस महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातच्या काही भागांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
कोणत्या जिल्ह्यात काय अलर्ट?
15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या 5 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये यलो, ऑरेंज किंवा ग्रीन अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. तर 16 ऑगस्टला रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये 16 ऑगस्टला मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
15 ते 19 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर 16 ते 21 ऑगस्टदरम्यान मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
तसंच पुढील 5 दिवसांमध्ये महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील काही भागांमध्ये किरकोळ ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान मच्छिमारांनी अरबी समुद्रात जाणं टाळावं अशा इशारादेखील हवामान खात्यानं दिला आहे.
अरबी समुद्राच्या पश्चिम-मध्य आणि लगतच्या भागात, तसंच पूर्व-मध्य, ईशान्य अरबी समुद्रात आणि कोकण किनारपट्टीवर 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे मच्छिमारांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान मुसळधार ते अती मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे काही गोष्टींबाबत खबरदारीचा इशारादेखील हवामान खात्यानं दिला आहे.
पावसामुळे वीज कोसळण्याची शक्यता असून, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडं किंवा कमकुवत इमारती कोसळण्याचा धोका आहे. तसंच स्थानिक पातळीवर अल्पकाळ वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. जोरदार वारा, पावसामुळे झाडं, बागा आणि उभ्या पिकांचं नुकसान होऊ शकतं.
तसंच कच्ची घरं, झोपड्या इत्यादींचं देखील नुकसान होण्याची शक्यता आहे.
काय काळजी घ्यावी?
हवामान खात्यानं नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा येथे वीज पडण्याचा इशारा दिला आहे. वीज पडणे अत्यंत धोकादायक असू शकते आणि व्यक्ती, संरचना आणि सामान्य पर्यावरणासाठी मोठा धोका निर्माण करते, असंही नमूद करण्यात आलं आहे.
या पार्श्वभूमीवर काय काळजी घ्यायला हवी याची माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रविण कुमार यांनी दिली.
1. घरात रहा: मोठ्या इमारतीत किंवा पूर्णपणे बंद असलेल्या वाहनात आश्रय घ्या. मोकळ्या जागा, उंच जमीन, उंच झाडे आणि कोणत्याही धातूच्या वस्तू टाळा.
2. इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनप्लग करा: विद्युत उपकरणे डिस्कनेक्ट करा आणि लँडलाइन टेलिफोन वापरणे टाळा. वीज पडल्याने वीज पडू शकते ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान होऊ शकते.
3. पाणी टाळा: वादळाच्या वेळी आंघोळ करू नका, आंघोळ करू नका किंवा नळ वापरू नका, कारण विजेचे प्रवाह प्लंबिंगमधून जाऊ शकतात.
4. खिडक्या आणि दारे दूर रहा: उघड्या खिडक्या किंवा दारे वापरून वीज इमारतींमध्ये प्रवेश करू शकते. सर्व खिडक्या आणि दारे बंद करा आणि त्यांच्याकडे झुकू नका.
5. धातूच्या वस्तू वापरणे टाळा: छत्री, गोल्फ क्लब, सायकली किंवा इतर कोणत्याही धातूच्या वस्तू बाहेर वापरण्यापासून परावृत्त करा. धातू वीज चालवते आणि वीज पडण्याचा धोका वाढवते.
6. माहिती ठेवा: कोणत्याही आपत्कालीन सूचना किंवा हवामान परिस्थितीत बदलांसाठी स्थानिक हवामान अद्यतने, बातम्या बुलेटिन किंवा अधिकृत घोषणा ऐका.
7. जर तुम्ही जवळपास निवारा नसताना बाहेर पडलात तर: झाडे, खांब किंवा कोणत्याही उंच वस्तूंपासून दूर सखल जागा शोधा. खाली वाकून बसा, तुमचे पाय एकत्र ठेवा आणि जमिनीशी तुमचा संपर्क कमीत कमी करा. मोकळी मैदाने, टेकड्या आणि पाण्याचे साठे टाळा.
लक्षात ठेवा, पाऊस सुरू होण्यापूर्वी किंवा थांबल्यानंतरही वीज कोसळू शकते. वादळ पूर्णपणे निघून जाईपर्यंत आणि परिस्थिती सुधारेपर्यंत सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे.
कृपया तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना आणि शेजाऱ्यांना सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा इशारा शेअर करा. माहिती ठेवा, सतर्क रहा आणि या वीज पडण्याच्या इशाऱ्यादरम्यान तुमच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या.
अधिक मदतीसाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत, पोलिस किंवा अग्निशमन विभागासारख्या तुमच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि सुरक्षित रहा, असंही आवाहन करण्यात आलं आहे.
राज्यात मान्सून वेळेआधी दाखल होऊन मग रेंगाळला, पण जुलैमध्ये बहुतांश भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आणि अनेक धरणांमध्ये पाणीसाठे वाढले.
पण यंदाच्या मोसमात आतापर्यॅतच्या आकडेवारीनुसार काही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
मान्सूनच्या पहिल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात आतापर्यंत कुठे किती किती पाऊस झाला आहे? तसंच मान्सूनच्या उरलेल्या दोन महिन्यांत किती पाऊस पडू शकतो? जाणून घेऊयात.
यंदा 1 जून ते 31 जुलैपर्यंत देशात सरासरीपेक्षा जास्त तर महाराष्ट्रातल्या सर्व विभागांत सरासरीएवढा पाऊस झाला आहे.
पण जिल्हावार आकडेवारी पाहिली, तर काही जिल्ह्यांमध्ये, विशेषतः मराठवाड्यात सरासरीपेक्षा यंदा कमी पाऊस झाला आहे.
31 जुलैला भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या अंदाजानुसार ऑगस्टमध्ये देशातल्या बहुतांश भागात सरासरीएवढा किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण पश्चिम किनारी प्रदेश आणि मध्य भारतात विशेषतः विदर्भात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.