Wednesday, August 27, 2025
Homeराजकीय घडामोडीअजितदादांकडून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम, राज्यात मोठा धक्का, बड्या नेत्याचा हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत...

अजितदादांकडून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम, राज्यात मोठा धक्का, बड्या नेत्याचा हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं, राज्यात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीचे 232 उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं, पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलं.

 

दरम्यान त्यानंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते हे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करताना दिसत आहेत.

 

दरम्यान राज्यात आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. प्रतिभा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती, अखेर त्यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. आज जळगावमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला, या मेळाव्यात त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला.

 

अजित पवार काय म्हणाले?

 

आम्ही सत्तेवर असलो तरच निर्णय घेऊ शकतो, आम्ही सत्तेत असलो तर धोरण ठरवू शकतो. प्रतिभा शिंदे ताई तुम्हाला राष्ट्रवादीत येण्याची चूक केली असं कधीही वाटणार नाही, आमचे सर्व सहकारी तुमच्यासोबत एकत्र काम करतील. गेल्या 35- 40 वर्षांत आम्ही अनेक चढउतार पाहिले, सत्ता असताना प्रश्न सुटतात, सत्ता नसताना काय अडचणी येतात हे अनुभवलं, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी हा पक्ष प्रवेश झाल्यामुळे जळगावमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद आता वाढणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -