पहाटे दोनच्या सुमारास धाइसी चोरीची घटना घडली. दोन घरात घुसून चोरट्यांनी सुमारे साडे दहा तोळे सोने आणि ६२ हजार रूपये रोख रक्कम त्याचचरोवर स्मार्ट फोन असा सुमारे ५ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल लपास केला आहे. मगदूम कुटुंबीय गाड झोपेत असताना ही बोरीची घटना पडली आहे. यामुळे परिसरात भीतीचे
वातावरण निर्माण झाले आहे. याचाचत शितल राजाराम मगद्य यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
घटनास्थळावरू तसेच पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, तारदाळ येथील मगदूम मळा परिसरात मोठी लोकवस्ती आहे. येथे शितल मगदूम तसेच प्रविण मगदूम हे आपल्या कुटुंबीयांसमवेत राहतात रविवारी पहाटे मगदूम कुटुंबीय गाढ झोपेत होते.
मुख्य दरवाजातून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. शितल मगदूम यांचे घरातील तिजोरीतून तीन तोळ्याच्या पाटल्या, दीड तोळ्याच्या तीन अंगठ्या, अर्धा तोळ्याची कानातील झुब्याची फुले, एक तोळ्याची चेन असे सहा तोळे दागिने तसेच रोख रक्कम ५० हजार रूपये आणि स्मार्ट फोन लंपास केला. त्यानंतर शेजारीच असणाऱ्या प्रकाश मगदूम यांच्या घरात देखील मुख्य दरवाजातून चोरटे आत घुसले. याप्रसंगी तिजोरी उघडताना आवाज झाल्याने घरातील वृध्द महिलेस जाग आली. तथापि चोरट्याने त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे गंठण, एक तोळ्याचे मंगळसूत्र, अर्धा तोळ्याची कानातील झुबे, रोख रक्कम १२ हजार रूपये तसेच स्मार्ट फोन असे सुमारे साडेचार तोळे दागिने व रोकड घेऊन पोबारा केला. या चोरीची खबर मगदूम परिवाराने तत्काळ शहापूर पोलिसांना कळविली. त्यानुसार शहापूर पोलिसांनी पहाटे घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. सदर चोरीचा प्रकार हा टेहळणी करून केला असावा, अशी चर्चा घटनास्थळी नागरिकांत आहे.