Sunday, August 24, 2025
Homeमहाराष्ट्रमुलांच्या भांडणातून संताप ; युवकावर कात्रीने हल्ला!

मुलांच्या भांडणातून संताप ; युवकावर कात्रीने हल्ला!

मुलांमध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरून युवकावर कात्रीने वार करण्यात आल्याची घटना विद्यानगर-सैदापूर येथे साई गार्डनच्या मागे असलेल्या कॉलनीत घडली. याबाबत प्रकाश श्रावण चव्हाण यांच्या फिर्यादीवरून विनोद तुकाराम सपकाळ, रोहिणी विनोद सपकाळ व अन्य एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी, विद्यानगर-सैदापूर येथे साई गार्डनच्या मागील बाजूच्या एका कॉलनीत राहणारे प्रकाश चव्हाण हे बुधवारी (दि. 12) रात्री 8.30 च्या सुमारास कामावरून घरी परत आले असता, विनोद सपकाळ, त्याची पत्नी रोहिणी व अन्य एक जण प्रकाश यांच्या नातेवाइकाला मारहाण करत असल्याचे दिसले. प्रकाश चव्हाण यांनी तेथे जाऊन भांडणे सोडवली. काही वेळाने चव्हाण हे सपकाळ रहात असलेल्या कॉलनीत गेले असता, विनोद सपकाळ, रोहिणी व अन्य एकाने प्रकाश यांना शिवीगाळ व दमदाटी केली. विनोद सपकाळने कात्रीने प्रकाश यांच्या खांद्यावर वार केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाले. याप्रकरणी हवालदार सिकंदर शेख तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -