Saturday, August 23, 2025
Homeब्रेकिंगभारताला धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना थेट फोन, पंतप्रधान नरेंद्र मोदींना..

भारताला धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना थेट फोन, पंतप्रधान नरेंद्र मोदींना..

भारत आणि अमेरिकेत टॅरिफच्या मुद्द्यावरून वाद सुरू असतानाच आता मोठ्या घडामोडींना वेग आलाय. डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांच्यात काल बैठक झाली. या बैठकीला सात महत्वाचे नेते देखील उपस्थित होते. ही बैठक रशिया आणि युक्रेनच्या युद्धाच्या मुद्यावर होती. या बैठकीतून सकारात्मक तोडगा निघाल्याच बोलले जातंय. मात्र, बैठक सुरू असतानाच अचानक असे काही घडले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट पुतिन यांना फोन केला आणि त्यांच्यासोबत संवाद साधला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुतिन यांनी फोन केला. आता लवकरच डोनाल्ड ट्रम्प, वोलोदिमीर जेलेंस्की आणि पुतिन यांच्यात बैठक होईल.

 

युक्रेनला त्यांच्या सुरक्षेची हमी पाहिजे आहे. डोनाल्ड ट्रम्प या मिटिंगमध्ये काही मुद्द्यावरून दादागिरी वोलोदिमीर जेलेंस्की यांंच्यावर करत असल्याचे सांगितले जातंय. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध थांबण्याची दाट शक्यता आहे. युक्रेनकडून स्पष्ट करण्यात आले की, जोपर्यंत त्यांच्या सुरक्षेची हमी दिली जात नाही, तोपर्यंत त्यांच्याकडून हे युद्ध थांबवले जाणार नाहीये. युक्रेनचा नाटोमध्येही समावेश होणार नाही. ही रशियाची अट आहे.

 

दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर सातत्याने टॅरिफसाठी दबाव टाकला जात असतानाच पुतिन यांनी थेट मोदींना फोन केला. यामुळे या टॅरिफच्या मुद्द्यावरून काहीतरी मार्ग निघण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प हे भारताबद्दल धक्कादायक विधाने करत आहे तर दुसरीकडे पुतिन यांच्यासोबतची जवळकता वाढवत आहेत. यामुळे भारताच्या विरोधात ते मोठा डाव टाकताना दिसत आहेत. मात्र, अमेरिकेतील बैठकीनंतर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला.

 

हेच नाही तर त्यांनी म्हटले की, भारताला टॅरिफशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. परत भारताला धमकी देण्यात आलीये. आता टॅरिफच्या मुद्द्यावर भारत काय भूमिका घेतो, याकडे संपूर्ण जगाच्या नजरा आहेत. भारत आणि अमेरिकेच्या व्यापार कराराबद्दल होणारी मिटिंग देखील अमेरिकेकडून रद्द करण्यात आली आहे. ही मिटिंग दिल्लीमध्ये होणार होती. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादण्यात आला आहे. भारत हा अजूनही अमेरिकेच्या पुढे झुकला नाहीये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -