चार दिवसांपूर्वी १२ वर्षीय सिद्धार्थ चव्हाण या मुलाचा खून करून त्याला विहिरीत फेकल्याची घटना समोर आली होती.त्यानंतर आता सोमवारी (दि.१८) सिध्दार्थच्याच २३ वर्षीय चुलत भावाचा मृतदेहही विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गंगापूर तालुक्यातील मुद्देशवाडगाव परिसरात घडली. स्वप्नील संजय चव्हाण (२३) असे मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, गुरुवारी (दि.१४) दुपारी हकीकतपूर शिव मृतदेह ारात राहणारा सिद्धार्थ आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. बराच वेळ उलटूनही तो परतला नाही. त्यानंतर शोध घेतला असता भारत दारुंटे यांच्या मक्याच्या शेत- किराणा ाजवळ त्याची सायकल, रिकामी पिशवी आणि शंभर रुपयांची नोट पडलेली आढळली.
त्याचबरोबर रक्ताचे डागही सापडले, जे थेट जवळच्या विहिरीकडे जात असल्याचे दिसून आले. गंगापूर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवून रात्री आठच्या सुमारास सिद्धार्थचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. घातपात झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्याची आई सुरेखा विजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
परिसरात भीतीचे सावट
स्वप्नीलच्या पश्चात आई-वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे. सलग दोन चुलत भावांचे मृतदेह विहिरीत सापडल्याने गावात भीती आणि शोककळा पसरली आहे. या दुहेरी प्रकरणाने तपासाचे धागे अधिक गुंतागुंतीचे झाले असून, पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
चार दिवसांत चुलत भावाचाही मृतदेह
या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांनी सिद्धार्थचा चुलत भाऊ स्वप्नील संजय चव्हाण हा जनावरांसाठी गवत आणायला गेला होता. मात्र तो घरी न परतल्याने शोध घेण्यात आला. दरम्यान, हकीकतपूर शिवारातील संतोष गंगाधर चव्हाण यांच्या गट क्रमांक १८ शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही माहिती पोलिस पाटील राऊत आणि सरपंच योगेश तारू यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविला.