पंचगंगा नदीवरील जुना पूल सोमवारपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मंगळवारी रात्री पातळी ६० फुटांवर होती. त्यामुळे नदीचे पाणी हळूहळू पात्राबाहेर येऊ लागले आहे. सलग सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शहरातील रस्त्यासह गटारी तुडुंब भरून वाहत आहेत. सखल भागामध्ये पाणी साचून रस्त्यावर खड्यांची संख्या वाढत आहे. मंगळवारी सकाळी मोठ्या पावसामुळे मुख्य रस्त्यावरील पेट्रोल पंपावर झाड कोसळल्याची घटना घडली. पंपावर वाहनधारकांची गर्दी होती. झाड पडल्याने तारांबळ उडाली. एका दुचाकीवर फांदी पडल्याने नुकसान झाले, तर पंपाच्या मशिनवर असणाऱ्या शेडवर झाड पडल्याने मोठे नुकसान झाले.