Saturday, August 23, 2025
Homeब्रेकिंगसीटवर बॅग होती, पण ती नव्हती..अखेर 12 दिवसांनी बेपत्ता अर्चनाच रहस्य उलगडल,...

सीटवर बॅग होती, पण ती नव्हती..अखेर 12 दिवसांनी बेपत्ता अर्चनाच रहस्य उलगडल, कुटुंबियांना मोठा शॉक

मध्य प्रदेशची अर्चना तिवारी मागच्या 12 दिवसांपासून बेपत्ता होती. अर्चना इंदूरमध्ये सिविल जज परीक्षेची तयारी करत होती. रक्षा बंधनाच्या सणाला घरी कटनीला जाण्यासाठी तिने 7 ऑगस्ट 2025 रोजी इंदूर-बिलासपूर नर्मदा एक्सप्रेस ट्रेन पकडली. पण प्रवासात मध्येच ती गायब झाली. बराच शोध घेतल्यानंतर अर्चन नेपाळ बॉर्डरजवळ पोलिसांना सापडली. तिला आता भोपाळला आणण्यात आलं आहे. पोलीस तिची चौकशी करतायत.

 

7-8 ऑगस्टच्या रात्री अर्चना भोपाळ रेल्वे स्टेशनजवळ दिसली होती. त्यानंतर ती अचानक गायब झाली. ट्रेन कटनी स्टेशनला पोहोचली, त्यावेळी तिच्या सीटजवळ तिची बॅग आणि काही आवश्यक सामान मिळालं. पण अर्चनाचा काही थांगपत्ता नव्हता. नातेवाईकांनी जीआरपीमध्ये ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबवली. सूत्रांच्या माहितीनुसार, अर्चना काठमांडू फिरायला गेली होती. तिच्यासोबत इंदूरचा एक मुलगा होता.

 

संपूर्ण टाइमलाइन समजून घ्या

 

7 ऑगस्ट 2025 : इंदूर येथे सिविल जज परीक्षेची तयारी करणारी 22 वर्षांची अर्चना तिवारी रक्षाबंधनाच्या सणाला आपल्या घरी कटनीला जाण्यासाठी इंदूर-बिलासपूर नर्मदा एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढली.

 

7-8 ऑगस्टची रात्री : भोपाळ रेलवे स्टेशन जवळ अर्चना रहस्यमयरित्या बेपत्ता झाली. शेवटची ती भोपाळ स्टेशन परिसरात दिसलेली.

 

बेपत्ता झाल्यानंतर : ट्रेन कटनीला पोहोचली, त्यावेळी तिच्या सीटवर तिची बॅग मिळाली. पण अर्चना नव्हती. तिच्या कुटुंबियांनी जीआरपी (गवर्नमेंट रेलवे पोलीस) मध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

 

पोलिसांचा तपास : पोलिसांनी तिच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन राबवलं. नर्मदाच्या नदी किनारी आणि जंगलात अर्चनाचा शोध घेण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज तपासलं. समजलं की, तिचं ट्रेन तिकिट ग्वालियरच्या एका कॉन्स्टेबलने बुक केलेलं.

 

19 ऑगस्ट 2025 : 12 दिवसानंतर अर्चनाने तिच्या आईला फोन करुन सांगितलं की, ती सुरक्षित आहे. पोलिसांनी कॉल लोकेशन ट्रॅक केलं आणि तिचा शोध सुरु केला.

 

19-20 ऑगस्ट 2025 : पोलिसांना अर्चना उत्तर प्रदेशच्या लखीमपुर खीरी जिल्ह्यात नेपाळ सीमेजवळ सापडली. पोलीस तिला भोपाळला परत घेऊन आले. जेणेकरुन पुढचा तपास करता येईल. तिच्या अचानक बेपत्ता होण्यामागच्या कारणांचा शोध घेता येईल.

 

अर्चना सुरक्षित स्थितीत सापडली आहे. पोलीस या सर्व प्रकरणाचा उलगडा करण्याच्या मागे लागले आहेत. 12 दिवसांपासून बेपत्ता असलेली अर्चना तिवारी स्वत: या घटनेची मास्टरमाइंड आहे. ती का गायब झालेली? याचा शोध पोलीस घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -