Saturday, August 23, 2025
Homeयोजना‘या’ योजनेतून मिळवा 10 लाखांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज, जाणून घ्या

‘या’ योजनेतून मिळवा 10 लाखांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज, जाणून घ्या

अशी अनेक मुले आहेत ज्यांना पुढे शिक्षण घ्यायचे आहे परंतु आर्थिक अडचणींमुळे ते आपले शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. देशातील जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत. यापैकीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना, जी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

 

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना

पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजना केंद्र सरकारने सन 2024 मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शासनाकडून आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत सरकार विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज देते. याशिवाय साडेचार लाखरुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना ही सरकार या योजनेअंतर्गत पूर्ण व्याज अनुदान देते.

 

 

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत भारतातील कोणताही विद्यार्थी 10 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज घेऊ शकतो, परंतु विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसावे. त्याचबरोबर विद्यार्थ्याला दहावी आणि बारावीत 50 टक्के गुण मिळणे आवश्यक होते.

 

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना कर्जाचे व्याजदर

 

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत साडेचार ते आठ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना कर्जावर तीन टक्के व्याज अनुदान मिळते.

 

या योजनेसाठी पात्रता आणि अटी

शैक्षणिक पात्रता: तुमचा प्रवेश NIRF रँकिंग असलेल्या चांगल्या कॉलेजमध्ये (Quality Higher Education Institution) झालेला असावा.

उत्पन्नाची मर्यादा: तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावं.

इतर अटी: तुम्ही आधीपासून कोणत्याही सरकारी शिष्यवृत्ती (Scholarship) किंवा व्याज अनुदान योजनेचा लाभ घेत नसावा. अभ्यासातून मध्येच बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना (शैक्षणिक किंवा शिस्तीच्या कारणांमुळे) या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

 

अर्ज कसा कराल आणि कोणती कागदपत्रे लागतील?

तुम्ही या योजनेसाठी pmvidyalaxmi.co.in या पोर्टलवर थेट अर्ज करू शकता. हे पोर्टल वापरण्यास अतिशय सोपे आणि पूर्णपणे डिजिटल आहे. या पोर्टलवर देशातील सर्व प्रमुख सरकारी आणि खासगी बँका जोडलेल्या आहेत.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे: ओळखपत्र: आधार कार्ड / पॅन कार्ड पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड / वीज बिल शैक्षणिक कागदपत्रे: 10 वी, 12 वी आणि पदवीचे गुणपत्रक, कॉलेजमधील प्रवेश पत्र. उत्पन्नाचा दाखला: राज्य सरकारकडून दिलेला कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला. इतर: पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुकची प्रत आणि तुम्ही कोणत्याही इतर सरकारी योजनेचा लाभ घेत नसल्याचं स्वयं-घोषणापत्र.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -