बहुप्रतिक्षित आयफोन १७ सिरीज ( Apple iPhone 17 Series) सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची आशा आहे. परंतू जसा जसा वेळ जात आहे तस तसे अपकमिंग सिरीजची नवनवीन माहीती समोर येत आहे. आता अलिकडेच आलेल्या नव्या रिपोर्टनुसार iPhone 17 Series च्या सर्व मॉडेल्सचे प्रोडक्शन आता भारतात केले जाणार आहे. या सिरीजला पाच स्थानिक फॅक्टरीत तयार केले जात आहे. ज्यातील दोन फॅक्टरीनेच अलिकडेच काम सुरु केले आहे.
ब्लुमबर्ग यांनी सूत्रांच्या आधारे सांगितले की यंदा पहिल्यांदा जेव्हा प्रीमियम प्रो व्हेरिएंट्स सहत सर्व नवीन iPhone मॉडल्सना भारतात मॅन्युफॅक्चर केले जात आहे. Apple कंपनीचे हे पाऊल व्यापक रणनितीचा भाग आहे. म्हणजे अमेरिकेला जाणाऱ्या शिपमेंटसाठी चीनवर आपले अवलंबित्व कमी करण्याचा आणि टॅरिफ रिस्क पासून वाचण्याचा डाव खेळला जात आहे. कंपनीने आधीच अमेरिकन बाजारपेठेसाठीचा आयफोन प्रोडक्शनचा एक मोठा हिस्सा चीनहून भारतात शिफ्ट केला आहे.
एक्सपोर्टमध्ये वाढ
ब्लुमबर्गच्या मते तामिळनाडू येथील होसूरमध्ये टाटा समुहाचा प्लांट आणि बंगळुरु विमानतळाच्या शेजारी फॉक्सकॉनचा हब या विस्ताराचे केंद्र आहे.या प्रकरणाशी संबंधित लोकांच्या मते टाटाने दोन वर्षांच्या आता भारताच्या सुमारे अर्ध्या आयफोन निर्मिती हँडल केली आहे. या बदलाने भारताच्या निर्यात आकड्यात वाढ झाली आहे. या वर्षी एप्रिल ते जुलै दरम्यान भारतातून ७.५ अब्ज डॉलर मुल्याचे आयफोन निर्यात झाले तर गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात हा आकडा १७ अब्ज डॉलर इतका होता.
ट्रम्प प्रशासन चीनी वस्तूंवर मोठा टॅरिफ लावण्याच्या दिशेने पुढे जात आहे. त्यामुळे आयफोन कंपनी अनिश्चित अमेरिकन व्यापार मोहोलशी लढत आहे. तरीही आयफोन सारख्या स्मार्टफोनला आतापर्यंत व्यापक टॅरिफपासून वाचवण्यात आले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की जर एप्पल अमेरिकेसाठी आयफोन तयार करु इच्छीत असेल तर त्यांनी अमेरिकेतच त्याची निर्मिती केली पाहीजे, चीन किंवा भारतात नाही !