तक्रार अर्जाच्या चौकशीकामी तक्रारदाराकडे वकिलाशी संगनमत करत तीन लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ हारून सय्यद (रा. शहापूर) व वकील पवनकुमार अशोक उपाध्ये (रा. साळुंखे मळा) यांच्यावर गावभाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
इचलकरंजी : यड्रावमध्ये कामगाराचा अपघात की घातपात ?
iPhone 17 Series Launch Date Leak: कंपनीच्या चुकेमुळे समोर आली तारीख
तक्रारदाराने फसवणूक संदर्भात पोलिस उपअधिक्षक कार्यालयात दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी सय्यद करत होते. या चौकशीदरम्यान सय्यद यांनी तक्रारदार व गैरअर्जदार यांची मध्यस्थी केली. त्यावेळी वकील उपाध्ये उपस्थित होते.
मुलींना दरमहा 2000 रुपये; सरकारने आणली नवी योजना
गेमिंग बिल मंजूर होताच Dream11 चा मोठा निर्णय; लोकांच्या पैशांचं काय होणार? मोठी अपडेट समोर!
उपाध्ये यांनी सय्यद यांच्या वतीने तक्रारदाराला कामासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगत त्यांच्याकडून ऑनलाईन ४० हजार रुपये स्वीकारले. ही रक्कम उपाध्ये यांनी नंतर सय्यद याच्याकडे दिली. तर सय्यद यांनी तक्रारदाराकडे असलेले चेक स्वतःकडेच ठेवले असून ठराविक रक्कम न दिल्यास ते परत देणार नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
हनिमूनला गेले पण…काहीच न घडल्यानं पत्नी थेट कोर्टात; अजब मागणीवर काय निर्णय आला?
हनिमूनला गेले पण…काहीच न घडल्यानं पत्नी थेट कोर्टात; अजब मागणीवर काय निर्णय आला?
पडताळणीदरम्यान वकील उपाध्ये यांनी तक्रारदाराला थेट तीन लाख रुपयांची मागणी केल्याचे समोर आले. तर या मागणीस सय्यद यांनीही प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी सय्यद व उपाध्ये यांच्याविरुद्ध गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा झाला आहे.