बनावट नोटा छपाईप्रकरणी येथील गावभाग पोलिसांनी आणखी एकास अटक केली आहे. अर्जुन अमर दळवी (वय २३, रा. विकली मार्केटजवळ)
असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
यावाचत माहिती अशी, मंगळवार पेठेत एका घरावर छापा टाकून गावभाग पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणी अनिकेत
विजय शिंदे (वय २५), राज रमेश सनदी (वय १९, रा. शहापुर) आणि शोयब अमजद कलावंत (वय १९, रा गावभाग) या तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून २ लाख ४२ हजारांच्या बनावट नोटांसह सुमारे ३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता. संशयीतांकडून वैभव विनायक उलपे (रा. कसबा बावडा) यानेही बनावट नोटा खपवण्यासाठी नेल्याचे समजताच त्याला अटक केली होती. त्याच्याकडूनही बनावट नोटा जप्त केल्या. पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान शहापूर पोलिसांनी बनावट नोटाप्रकरणी अटक केलेला अर्जुन दळवी हा सध्या तुरुंगात होता. बनावट नोटा छपाई प्रकरणात त्याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.