Saturday, August 23, 2025
Homeब्रेकिंग‘लाडकी बहिण’नंतर महायुती सरकारची महिलांना मोठी भेट

‘लाडकी बहिण’नंतर महायुती सरकारची महिलांना मोठी भेट

लाडकी बहीण योजनेनंतर (scheme)आता राज्य सरकार महिलांसाटी आणखी एक योजना राबवणार आहे. केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमाअंतर्गंत ही योजना राबण्यात येणार आहे. नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात आता पाळणा योजना सुरू होणार आहे. नोकरदार महिलांच्या जीवनाला नवी ताकद देणारी, त्यांच्या मुलांसाठी सुरक्षित आणि पोषणयुक्त वातावरण तयार करण्यासाठी ही योजना आणली जाणार आहे.

 

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविली जाणार असून, नोकरदार मातांच्या मुलांच्या संगोपनाची मोठी जबाबदारी आता शासन उचलणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात 345 पाळणा केंद्रे सुरू होणार आहेत. यासाठी मिशन शक्ती अंतर्गत केंद्र व राज्य शासन अनुक्रमे 60:40 या हिश्शाने निधी उपलब्ध करून देणार आहे.

 

केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची काळजी घेता यावी. यासाठी 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत ‘पाळणा’ ही योजना(scheme) सुरू करण्यात आली आहे. यामुळे कामगार व नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळणार असून मुलांच्या संगोपनासाठी सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या 13 ऑक्टोबर 2024 रोजीच्या निर्णयानुसार या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.

 

 

 

कामगार महिलांना दिलासाः नोकरी करणाऱ्या महिलांना कामादरम्यान आपल्या मुलांची काळजी घेता यावी, यासाठी ही योजना तयार केली आहे.मुलांच्या संगोपनासाठी सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे.समावेशक सुविधा:अंगणवाडीत ६ महिने ते ६ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी ही सुविधा मिळेल.

 

नोकरदारांच्या मातांच्या 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी देखभाल सुविधा व डे केअर सुविधा 3 वर्षांखालील मुलांसाठी पूर्व उद्दीपन तर 3 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी पूर्व शालेय शिक्षण.मुलांसाठी सकस आहार – सकाळचा नाश्ता, दुपारचे गरम जेवण आणि संध्याकाळचा पौष्टिक नाश्ता ,पूरक पोषण आहार, आरोग्य तपासणी, लसीकरण, वाढीचे नियमित निरीक्षण.वीज, पाणी, बालस्नेही शौचालय आदी सर्व मूलभूत सोयीसुविधांसह मुलांसाठी सुरक्षित वातावरण.

 

 

महिन्यातील 26 दिवस व रोज 7.5 तास पाळणा सुरु राहील.एका पाळण्यात जास्तीत जास्त 25 मुलांची व्यवस्था.प्रशिक्षित सेविका (किमान बारावी उत्तीर्ण) व मदतनीस (किमान दहावी उत्तीर्ण) यांची नेमणूक.वयोमर्यादा 20 ते 45 वर्षे, भरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य.जिल्हास्तरीय समितीमार्फत पारदर्शक निवड प्रक्रिया.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -