पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया ही पती-पत्नीच्या जीवावार बेतल्याचे उघड झाले आहे. लिव्हर ट्रान्सप्लांट ऑपरेशननंतर पती आणि पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कदायाक घटना उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे. रुग्णालयाने हलगर्जीपणा केल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी लावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील डेक्कन परिसरातील प्रसिद्ध सह्याद्री हॅास्पिटल मधील ही घटना आहे. बापू बाळकृष्ण कोमकर आणि कामिनी बापू कोमकर असे मृत पती पत्नीचे नाव आहे. याप्रकरणात रुग्णालयाने हलगर्जीपणा केला आरोप कोमकर यांच्या नातेवाईकांनी सह्याद्री हॅास्पिटलवर लावला आहे.
बुधवारी ऑपरेशन आणि दुसऱ्याच दिवशी मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात बुधवारी, बापू कोमकर यांच्यावर लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झाली. त्यांची पत्नी कामिनी कोमकर यांनीच बापू यांना स्वतः चे लिव्हर दान केले होते. मात्र बुधवारी हे ऑपरेशन झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत, शुक्रवारी बापू कोमकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खेदजनक गोष्ट म्हणजे त्यांच्या मृत्यूला आठ दिवस होतात न होतात तोच त्यांची पत्नी कामिनी यांनी अखेरचा श्वास घेतला. नुकताच कामिनी यांचाही सह्याद्री रुग्णालयात मृत्यू झाला.
यामुळे कोमकर कुटुंब अतिशय शोकाकूल आहेत. सह्याद्री हॅास्पिटल आणि तेथील डॅाक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केला, त्यामुळेच आधी बापू कोमकर व नंतर त्यांची पत्नी कामिनी यांचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सह्याद्री हॅास्पिटलचे व्यवस्थापन आणि संबंधित डॅाक्टरांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कोमकर यांच्या शोकाकुल नातेवाईकांनी केली आहे. याप्रकरणी अधिक तापस सुरू आहे.
बातमी अपडेट होत आहे.