Sunday, August 24, 2025
Homeब्रेकिंगPM मोदींची मोठी घोषणा, वर्षअखेरीस पहिली मेड इन इंडिया मायक्रोचिप बाजारात येणार,...

PM मोदींची मोठी घोषणा, वर्षअखेरीस पहिली मेड इन इंडिया मायक्रोचिप बाजारात येणार, नेमकी काय असते मायक्रोचिप?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल शनिवारी (दि. 24) काही मोठ्या घोषणा केल्यात. भारत 2035 पर्यंत आपलं स्वतःचं अवकाश केंद्र स्थापन करेल, असं ते म्हणालेत. इतकंच नाही तर यावर्षीच्या अखेरीपर्यंत भारत मायक्रोचिप्ससुद्धा (Microchip) बनवेल, अशी मोठी घोषणा त्यांनी केली आहे.

 

मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर, एटीएम कार्डसाठी लागणारी मायक्रोचिप अजूनही भारतात बनत नाही. पण मेड इन इंडिया असं लिहलेली मायक्रोचिप तुम्हाला यावर्षी अखेर पाहायला मिळेल असं मोदी म्हणाले. भारत सध्या वर्षाला 2 लाख कोटी रुपये मायक्रोचिपच्या आयातीवर खर्च करतो आणि 2030 पर्यंत ही आयात 10 लाख कोटींवर जाण्याची शक्यता आहे. आता सेमीकंडक्टरसंबंधीच्या कंपन्या भारतात येऊ लागल्यात, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

 

50-60 वर्षांपूर्वी भारतात सेमीकंडक्टर चिप्स तयार होऊ शकल्या असत्या

इकोनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम 2025 मध्ये आपले संबोधन देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताने सेमीकंडक्टरच्या देशांतर्गत उत्पादनाची संधी अनेक दशकांपूर्वी गमावली होती, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आपण सर्वजण जाणतो की 50-60 वर्षांपूर्वीच भारतात सेमीकंडक्टर तयार होण्याची क्षमता होती. मात्र, आपण ती संधी गमावली आणि अनेक वर्षे तीच स्थिती टिकून राहिली. आज आपण ती परिस्थिती बदलली आहे. भारतात सेमीकंडक्टरशी संबंधित फॅक्टऱ्या उभारल्या जात आहेत. स्वदेशी विकसित पहिली सेमीकंडक्टर चिप याच वर्षाअखेरीस बाजारात उपलब्ध होईल.

 

काय असते मायक्रोचिप?

1 मायक्रोचिप म्हणजे सिलिकॉनपासून बनवलेला सर्किटचा तुकडा.

 

2 मायक्रोचिप सर्किटमध्ये असतात ट्रान्झिस्टर,रेझिस्टर्स आणि इतर कॉम्पोनन्ट्स.

 

3 कोणतंही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन मायक्रोचिपशिवाय बनणं अशक्य.

 

4 कॉम्प्युटर, मोबाईल, टॅबलेट्स, एटीएएम, क्रेडीट कार्डमध्ये मायक्रोचिप असते.

 

5 भारतात अजूनही बनत नाहीत मायक्रोचिप, वर्षाला 2 लाख कोटींच्या चीप्सची आयात.

 

6 2021 पासून मायक्रोचिप बनवण्याच्या कामाला भारतात वेग.

 

7 अमेरिका,तैवान, द. कोरिया, चीन, जपान, नेदरलँड आणि जर्मनी हे सातच देश बनवू शकतात मायक्रोचिप.

 

भारताची ईव्ही निर्यात 100 देशांमध्ये पोहोचणार

दरम्यान, संबोधनादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी तुम्हाला भारताच्या आणखी एका यशाबद्दल सांगू इच्छितो. भारत लवकरच इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) क्षेत्रात एक मोठी शक्ती बनणार आहे. भारत आता जगातील 100 देशांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची निर्यात करणार आहे. या यशाशी संबंधित एक खूप मोठा कार्यक्रम मंगळवारी (26 ऑगस्ट 2025) दोन दिवसांनी आयोजित करण्यात येत आहे,” असेदेखील त्यांनी यावेळी म्हटले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -