Sunday, August 24, 2025
HomeBlogइचलकरंजीत साकारतोय गजमहल : ६ हजार चौ.फु. परिसरात सजणार आकर्षक मंडप

इचलकरंजीत साकारतोय गजमहल : ६ हजार चौ.फु. परिसरात सजणार आकर्षक मंडप

ताजी बातमी ऑनलाईन टिम :
वस्त्रनगरीच्या गणेशोत्सवात आकर्षणाचे केंद्र ठरणाऱ्या कलानगरचा महागणपती या मंडळाने यंदाही चित्ताकर्षक गजमहालाची उभारणी करत गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासूनच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गणेश आगमनापूर्वीच या मंडळाच्या देखावा संदर्भात शहरात कुतूहलाची चर्चा होत आहे.चित्ताकर्षक मांडणी, मनमोहक सजावट अन् उत्सव काळात आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांमुळहे पंचक्रोशीतील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरलेल्या कलानगरचा महागणपती या मंडळाने यंदा अनोख्या अशा गजमहलची उभारणी केली आहे.
तब्बल १ हजार लहान मोठे हत्तींवर उभारलेला हा महल ६ हजार चौरस फुट जागेत साकारला जात आहे. त्याचबरोबर २८ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या गणेशोत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन के ले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
कलानगरचा महागणपती या मंडळाने अनेक वर्षापासून अनावश्यक खर्चाला फाटा देत मनमोहक, चित्ताकर्षक सजावट व धार्मिक कार्यक्रमांवर भर दिला आहे. त्यामुळे कलानगरचा महागणपती हा प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवत या मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदासुध्दा या मंडळाने आकर्षक गजमहाल उभारला आहे. ६० बाय ९६ इतक्या भव्य आकारात उभारलेला हा गजमहाल इचलकरंजी आणि पंचक्रोशीतील नागरिकांचे आकर्षण ठरणार आहे. एप्रिल महिन्यापासून हा महाल उभारण्याचे काम सुरु असून यामध्ये कामे मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वतः काम करत आहेत.
महालाच्या डिझाईनपासून संगोटीपर्यंत ते गणेशमुर्तीच्या सजावटीपर्यंत स्वतः कार्यकर्ते हातभार लावत आहेत. २८ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर अखेर आयोजित कार्यक्रमात सामुहिक गणपती अर्थवशीर्ष पठण, दररोज वेगवेगळ्या रुपात पुजा आणि महाआरती, गणेश याग, वारकरी भजन, उत्सवमुर्तीचा भागातून पालखी सोहळा त्याचबरोबर गीतगायन, नृत्याचे कार्यक्रम राबवण्यात आले आहेत. हवा आणि आवाजाच्या प्रदुषणाला छेद देत सामाजिक बांधिलकी जपत या मंडळाने आपली वाटचाल सुरु ठेवली आहे. विसर्जनाची मिरवणुक देखील अत्यंत आगळ्यावेगळ्या स्वरुपात काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सचिन तोडकर, प्रशांत सपाटे, सुनिल तोडकर, अभिषेक वाळवेकर, रमाकांत वाळवेकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -