Monday, August 25, 2025
Homeब्रेकिंगराज्यावर मोठं संकट! भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तासात…

राज्यावर मोठं संकट! भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तासात…

राज्यात मागच्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याचे बघायला मिळाले अनेक ठिकाणी पूर आले तर शेती पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. आता कुठे पावसापासून दिला मिळाला असतानाच आता परत एकदा पावसाचा इशारा हा देण्यात आलाय. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने देशातील अनेक राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तसेच मध्य प्रदेशमध्येही कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. काही भागांमध्ये आज ऑरेंज आणि येलो अलर्टचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला. पुढील दोन दिवसात राज्यात परत एकदा पावसाचा जोर असेल.

 

कोकण आणि मराठवाड्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, परभणी लातूर,नांदेड, हिंगोली आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला. बाकी उर्वरित राज्यात येलो अलर्ट देण्यात आलाय. मुंबईमध्ये आज सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसताना दिसत आहेत. सकाळीच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

 

25 तारखेला मुंबईमध्ये अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला होता. मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यामध्ये सध्या गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू असतानाच जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईमध्ये सध्या पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. सकाळच्या पावसामुळे शाळेला निघालेल्या मुलांची आणि पालकांचीही तारांबळ उडाली आहे. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

 

मुंबईसह उपनगरांमध्ये 15 ऑगस्टला पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. सकाळी चार वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला आहे. काही तासांच्या पावसामध्येच रस्त्यांना पावसाचा स्वरूप प्राप्त झाले आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचा थेट परिणाम हा मुंबईच्या लोकल सेवेवर झाला होता. अनेक लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. रेल्वे रूळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. प्रशासनाकडून सध्या पावसाचा जोर पाहता उपायोजनांना सुरूवात करण्यात आलीये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -