सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) सेंट्रलाइज्ड एम्प्लॉयमेंट इन्फॉर्मेशन (CEN) 04/2025 अंतर्गत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. याबाबत एक एक अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. याअंतर्गत विविध झोनमधील 300 पेक्षा जास्त रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधी सुरु होणार? पात्रता काय असणार? निवड कशी होणार? पगार किती मिळणार? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अर्ज कुठे करायचा?
सेक्शन कंट्रोलर पदांसाठी अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी या तारखेला किंवा त्यापूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पदांसाठी RRB च्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे. मंडळाने उमेदवारांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
पात्रता आणि पगार
अर्ज करणाऱ्या उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल 33 वर्षे असणे आवश्यक आहे. सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातल उमेदवारांनी वयात सूट दिली जाणार आहे. या भरतीद्वारे निवडलेल्या उमेदवारांना 35400 (लेव्हल 6) पगार मिळणार आहे. तसेच इतर भत्तेही मिळणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना हातात जास्त पगार मिळणार आहे.
अर्ज करण्यासाठी किती शुल्क लागेल
सेक्शन कंट्रोलर पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य/ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 500 अर्ज शुल्क असणार आहे. तसेच अनुसूचित जाती/जमाती/महिला/दिव्यांग उमेदवारांना 250 रुपये अर्ज शुल्क असणार आहे.
निवड प्रक्रिया कशी असेल?
आरआरबी सेक्शन कंट्रोलर पदासाठीच्या निवड प्रक्रियेत विविध टप्पे असणार आहेत. सुरुवातीला संगणक-आधारित दोन टप्प्यात (सीबीटी 1 आणि सीबीटी 2) परीक्षा होईल. ही परीक्षा पास केलेल्या उमेदवारांची कौशल्य चाचणी होणार आहे. या फेरीत पात्र ठरणाऱ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. यानंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी होईल आणि त्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध होणार आहे.