इचलकरंजी : शहापूर जवळ 14 फुटी श्रींची मूर्ती दुभंगली
ताजी बातमी ऑनलाईन टीम
गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेला आहे. यामुळे अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांची मोठी लगबग सुरू झाली आहे. यात यंदाच्या वर्षी अनेक गणेश मंडळे गणेश चतुर्थी पूर्वीच आपापले श्रींची मूर्ती आणून ठेवत आहेत.
दरम्यान आज सोमवारी संतमळा परिसरातील एका मंडळाची कार्यकर्ते त्यांची 14 फुटी श्रींची गणेश मूर्ती घेऊन जात होते. यादरम्यान शहापूर येथील विश्रामगृहाजवळ आल्यानंतर एका वायरीच्या अडथळ्यामुळे श्रींची मूर्ती दुभंगली. यामुळे या मंडळाचे कार्यकर्त्यांबरोबरच प्रत्येक भाविक नाराज झाले. या मूर्तीचे रात्री उशिरापर्यंत विसर्जनाचे काम सुरू होते.