Monday, August 25, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : श्रींची मूर्ती अंगावर पडल्याने पाच जण जखमी

इचलकरंजी : श्रींची मूर्ती अंगावर पडल्याने पाच जण जखमी

इचलकरंजी : श्रींची मूर्ती अंगावर पडल्याने पाच जण जखमी

ताजी बातमी ऑनलाइन टीम

कबनूरच्या कोले मळा परिसरातील एका मंडळाचे कार्यकर्ते श्रींची मूर्ती घेऊन जात असताना मूर्ती अचानक कलंदली आणि पडणारी मूर्ती सावरण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांच्या अंगावर पडली. ही घटना रविवार रात्री घडली.

या मंडळाची ही मूर्ती दहा ते बारा फुटांची होती रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे कार्यकर्ते जवाहर नगर हायस्कूल समोरून ही मूर्ती घेऊन जात होते यादरम्यान ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे ट्रॉली लडबडली आणि ही मूर्ती कलंदली. ही घटना घडत असताना या मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी मूर्तीला धरण्याचा प्रयत्न केला मात्र ही मूर्ती त्यांच्या अंगावर पडली यामुळे पाच जण जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली यावेळी शिवाजीनगर पोलीस ही दाखल झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -