Monday, August 25, 2025
Homeब्रेकिंगसाखरपुड्याबाबत सचिन तेंडुलकरने मौन सोडलं, चाहत्याच्या प्रश्नाचं दिलं थेट उत्तर

साखरपुड्याबाबत सचिन तेंडुलकरने मौन सोडलं, चाहत्याच्या प्रश्नाचं दिलं थेट उत्तर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा नुकताच झाला. वयाच्या 25 व्या वर्षी अर्जुनने मैत्रीण सानिया चंडोकसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. 14 ऑगस्ट रोजी मोजक्या नातेवाईकाच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला. या दोघांचा साखरपुडा झाल्याचं मिडिया आणि सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं. पण दोन्ही कुटुंबियांकडून अधिकृत असं काहीच सांगण्यात आलं नव्हतं. दोघांच्या साखरपुड्याचा फोटोही समोर आला नाही. त्यामुळे सचिन आणि अर्जुनच्या चाहत्यांचा संभ्रम वाढला होता. पण यावर अखेर पडदा पडला आहे. कारण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मुलाचा साखरपुडा झाल्याचं त्याने जाहीरपणे सांगून टाकलं. एका चाहत्याने सचिन तेंडुलकरला सोशल मीडियावर अर्जुन आणि सानियाच्या नात्याबाबत थेट विचारलं. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म रेडिट डॉट कॉमवर Ask Me Anything हा कार्यक्रम पार पडला. तेव्हा एका चाहत्याने सचिनला थेट प्रश्न विचारला.

 

चाहत्याने सचिन तेंडुलकरला विचारलं की, खरंच अर्जुनचा साखरपुडा झाला आहे का? त्यावर सचिनने उत्तर दिलं आणि होकार दिला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने लिहिलं की, ‘हा, त्याचा साखरपुडा झाला आहे आणि आम्ही त्याच्या आयुष्याच्या नव्या टप्प्यासाठी खूपच उत्सुक आहोत.’ सचिनच्या या उत्तरामुळे आता अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाला हे अधिकृत झालं आहे. त्यामुळे काय खरं आणि काय खोटं यावर पडदा पडला आहे. अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा झाला असून लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. सानिया चंडोक ही व्यवसायाने वेटरनरी असिस्टंट आहे. ती मुंबईत स्वत:चा पेट स्टुडिओ चालवते. तर अर्जुन तेंडुलकर देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्यासाठी खेळतो. तसेच आयपीएल मुंबई इंडियन्स संघात संघात आहे.

 

साखरपुडा झाल्यानंतर सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेल्या सारा तेंडुलकरने काहीच पोस्ट केलं नाही. त्यामुळे खरंच असं झालं आहे का हा संभ्रम होता. तेंडुलकर आणि चंडोक कुंटुबियांनी कमालीची गुप्तता पाळही. साखरपुड्याचा फोटो किंवा व्हिडीओही शेअर केला नाही. सोशल मीडियापासून कुटुंबिय दूर राहिले. मिडिया रिपोर्टनुसार, अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुड्याचा छोटासा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला दोन्ही कुटुंब आणि जवळचे मित्र होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -