Thursday, November 13, 2025
Homeइचलकरंजीखोतवाडीत बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर : भीतीचे वातावरण

खोतवाडीत बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर : भीतीचे वातावरण

तारदाळ परिसरातील खोतवाडी येथे बिबट्या आढळल्याच्या संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. बुधवारी रात्री उशीरा जयशिवराय नगर परिसरात असणाऱ्या स्थानिकांना विबट्यासारखा प्राणी दिसल्याचा दावा त्यांनी केला. यामुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

 

याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाला कळविले. त्यानंतर तात्काळ वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत ही शोध मोहिम सुरू होती. या घटनेची माहिती सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच बध्यांची गर्दी झाली होती. स्थानिक ग्रामस्थांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी वनविभागाकडे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -