Tuesday, September 16, 2025
Homeमहाराष्ट्रजग हादरलं! भारताने घेतला रशियाच्या तेल खरेदीबद्दल अखेर मोठा निर्णय, डोनाल्ड ट्रम्प...

जग हादरलं! भारताने घेतला रशियाच्या तेल खरेदीबद्दल अखेर मोठा निर्णय, डोनाल्ड ट्रम्प यांच्या…

जडोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानेच आपण हा टॅरिफ लावल्याचे त्यांनी म्हटले. काहीही करून भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे यासाठी भारतावर दबाव टाकला जात आहे. जगात रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणारा चीन हा देश आहे. मात्र, अमेरिकेने चीनवर टॅरिफ लावण्याची हिंमत केली नाही. अमेरिकेच्या विरोधात अनेक देश पुढे येताना दिसत आहेत. भारत काहीही झाले तरीही अमेरिकेपुढे झुकणार नसल्याचे स्पष्ट आहे.

 

डोनाल्ड ट्रम्प यांना असे वाटले की, भारतावर इतका मोठा टॅरिफ लावल्यानंतर भारत लगेचच अटी मान्य करेल आणि तेल खरेदी करणे बंद करेल, असे अमेरिकेला वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. उलट भारताकडून आता अमेरिकेला जोरदार धक्का दिला जाणार आहे. नुकताच मिळालेल्या रिपोर्टनुसार, सप्टेंबर महिन्यात भारत हा रशियाकडून जास्त तेल खरेदी करण्याच्या तयारीत आहे.

 

भारतीय रिफायनरी ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात 10 ते 20 टक्के अधिक रशियाकडून तेल खरेदी करणार आहे. रिपोर्टमध्ये हे सांगण्यात आलंय की, रशियाकडे सप्टेंबर महिन्यात अधिक तेल असणार आहे. काही दिवसांपूर्वीच युक्रेनकडून रशियाच्या 10 रिफायनरीवर हल्ला केला. युक्रेनसोबतच्या सुद्धादरम्यान 2022 मध्ये पश्चिमी देशांनी रशियाच्या तेलावर बहिष्कार टाकला. त्यावेळी भारत हा रशियाच्या बाजूने उभा राहिला आणि मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केले.

 

त्यावेळीही अमेरिकेने यावर हस्तक्षेप घेतला होता. भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करून त्यावर रिफायनरी करत आहे आणि मोठ्या प्रमाणात पैसे कमावत आहे, असा आरोप सातत्याने अमेरिकेकडून केला जात आहे. हेच नाही तर भारताला मोठी ऑफर देत अमेरिकेकडून सांगण्यात आले की, भारताने जर रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले तर त्यांच्यावरील 25 टक्के टॅरिफ आम्ही रद्द करू. आता भारताने टीका न करता रशियाकडून अधिक तेल खरेदी करत मोठा धक्का हा अमेरिका दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -