Friday, December 27, 2024
Homeकोल्हापूरबाळूमामांच्या नावाचा वापर करणाऱ्या मनोहर भोसले विरोधात दंड.

बाळूमामांच्या नावाचा वापर करणाऱ्या मनोहर भोसले विरोधात दंड.


श्री सद्गुरू बाळूमामांच्या 55 व्या समाधी दिनानिमित्त आदमापूरच्या नागरिकांसह भक्तगण शनिवारी एकवटून बाळूमामाच्या नावाचा वापर करून मोठा झालेल्या मनोहर भोसले याच्या विरोधात दंड थोपटले आहेत. बाळूमामांच्या कण्या, ताक, अमृत, प्रसाद घेऊन भोसलेसह सर्वच भोंदूबाबांचा धिक्कार व निषेध करण्यात आला. बाळूमामांचा भंडारा देऊन अंधश्रद्धा वाढीस लावणार्या भोंदूबाबापासून सावध राहावे. गैरमार्गाचा वापर करून बाळूमामांच्या नावाने कोणीही देणगी मागत असेल, तर त्यांना सहकार्य न करता नजीकच्या पोलिस ठाण्यात अशा भोंदूची तक्रार करा, असेही आवाहन करण्यात आले.


बाळूमामांच्या 5 सप्टेंबर या समाधी दिनानिमित्त आदमापूर येथील मरगुबाई मंदिर परिसरात सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले होते. यावेळी बाळूमामा देवालय समितीचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, माजी सरपंच दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, एम. डी. पाटील अँड राजेंद्र देशमुख, संतोष देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


सरपंच विजय गुरव म्हणाले, मनोहर भोसले यांनी बाळूमामांच्या नावाचा वापर करून आपला आर्थिक लाभ करून घेतला. वंशज, अवतार, शिष्य अशी नावे परिधान करून भक्तांची दिशाभूल केली. भक्तांमध्ये चुकीचा संदेश देऊन नकळत अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम केले. भविष्यात असे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे भोंदू तयार होऊ नयेत, याची जबाबदारी बाळूमामा भक्तांनी घ्यावी.


प्रा. एस. पी. पाटील, मच्छिंद्र टिंगरे, दिनकरराव कांबळे, दयानंद कोणीकेरी, सतीश जाधव, धनाजी पाटील, आनंदा पाटील, नामदेव पाटील यांनी भाषणात भोसलेचा निषेध केला.


प्रा. एन. एच. पाटील यांनी केले. यावेळी सतीश जाधव, रुकडीकर मामा, एस. के. पाटील, गुंडोपंत पाटील, सुधीर पाटील, अमर पाटील, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे प्रतिनिधी, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -