ज्योतिष शास्त्रानुसार, सप्टेंबर (September) महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, सध्या भाद्रपद महिना सुरु आहे. हा महिना गणरायाचा असल्या कारणाने अनेक शुभ कार्य या कालावधीत तुमच्या हातून घडतील. ग्रहांची स्थिती देखील चांगली असेल. तसेच, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे सप्टेंबरचा पहिला आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष ते कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला आरोग्यात चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. या काळात तुमचे फिरायला जाण्याचे प्लॅन्स देखील होऊ शकतता. तसेच, कोर्ट कचेरीच्या संदर्भातील वाद लवकरच मिटण्याची शक्यता आहे.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
नवीन आठवडा वृषभ राशीसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या कालावधीत तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. महिन्याची सुरुवातच असल्या कारणाने नोकरीच्या संधीदेखील चालून येतील. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही गोष्टींबद्दल पश्चात्ताप वाटेल. अशा वेळी तुमच्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करा.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा फार शुभकारक असणार आहे. या दरम्यान तुम्ही जे काही निर्णय घ्याल त्यासाठी सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल. तसेच, मित्र-परिवाराबरोबर तुमचे चांगले संबंध निर्माण होतील. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात कोणतीच जोखीम हाती घेऊ नका. तसेच, जे काही कार्य कराल त्यात मन लावून काम करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत विचारात घेऊनच निर्णय घ्या. आरोग्याच्या बाबतीत कोणताच हलगर्जीपणा करु नका. तसेच, वैयक्तिक गोष्टी कोणाशीही शेअर करु नका.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीसाठी सप्टेंबरचा पहिला आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी करु शकता. तसेच, व्यवसायाचा विस्तार आणखी मोठा कसा होईल याचा तुम्ही विचार करावा. संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवा. सकारात्मकता राहील. तसेच, सामाजिक कार्यात सहभागी व्हा.
कन्या रास (Cancer Weekly Horoscope)
कन्या राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी जास्त ताण जाणवणार नाही. तसेच, तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. तुम्हाला त्यात चांगलं यश मिळेल. घरात सकारात्मक वातावरण राहील याचा प्रयत्न करा. नवीन गोष्टी शिकत राहा.