ऐन गणेशोत्सवात कोकणात दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. खेड येथील तरुण दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी नदीत बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच चिपळूण येथे आता एक दुसरी मोठी घटना घडली आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी चिपळूण येथे आलेला युवक विहिरीत पोहण्यासाठी गेला आणि मोठा घात झाला. पोहताना विहिरीत बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. चिपळूण तालुक्यातील तळसर कदमवाडीतील महेश विष्णू कदम युवक गणेशोत्सवासाठी आला होता आपल्या मित्रांबरोबर तो विहिरीत पोहण्यासाठी गेला.
गावात दहावी पर्यंत शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरीसाठी त्याने मुंबई गाठले. बेलापूर येथील एका हॉटेल मध्ये कूक म्हणून आठ वर्ष कामाला होता. शेतकरी कुटुंबातील असलेला तळसर कदमवाडीतील विष्णू कदम यांना तीन मुले असून त्यातील महेश कदम हा लहान मुलगा होता. गणपती सणासाठी दोन दिवसापूर्वी तो घरी आला होता त्यांच्या घरात प्रसन्न आनंदी वातावरण होते, आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जेवण आटोपल्यावर आई वडील यांच्याशी गप्पा मारत बसला होता.
गावातील हनुमान मंदिरात बसलेली काही मुले त्यांच्या घरी आली. गावातील विहिरीत पोहण्यासाठी घेऊन गेले. यावेळी त्याचे आई वडील यांनी त्याला जाऊ नकोस असे सांगितले. पण मित्रांनी खूप आग्रह केला, त्यामुळे त्यांच्याबरोबर विहीरीत पोहण्यास गेला. विहीर खूप खोल असल्यामुळे महेश कदम यांनी उडी मारली खरी पण तिथेच घात झाला तो बुडाला पाण्यात तो तरंगू लागला. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
सर्वांनी विहिरीकडे धाव घेतली त्याची त्याचा भाऊ योगेश कदम याला माहिती मिळताच त्यांनी विहिरीकडे धाव घेतली. समोरचे चित्र पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली तो टाहो फोडून रडू लागलं. त्यानंतर त्याचा मृतदेह गळ टाकून बाहेर काढण्यात आले सदरची घटना साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली त्याच्यावर शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाईक यांच्याकडे ताब्यात देण्यात आले. मात्र त्याच्या मृत्यूने तळसर कदम वाडीत एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक तपास शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील करीत आहेत. ऐन गणेशोत्सवात कदम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून तळसर गाव परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.