दिघी परिसरात बांधकाम मजुरांच्या खोलीत चोरीसाठी आलेल्या तिघांपैकी एकास पकडून झालेल्या मारहाणीनंतर मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळ पवार (वय अंदाजे ३०) हा चोरीसाठी दोन साथीदारांसह सोमवारी (दि. 25 ऑगस्ट 2025) पहाटे सुमारे 2.30 वाजता मजुरांच्या खोलीत घुसला होता. आवाज झाल्याने कामगार जागे झाले आणि त्यांनी पाठलाग करत पवार याला पकडून त्यास मारहाण केली. सकाळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पवार याला तातडीने प्राथमिक उपचारानंतर खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान दिनांक 29 ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून, पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.