Thursday, December 18, 2025
Homeमहाराष्ट्रवडिलांनी घेतली उचल, पण त्यांच्या बालकाचा छळ; करून घेतली कष्टाची कामे, चार...

वडिलांनी घेतली उचल, पण त्यांच्या बालकाचा छळ; करून घेतली कष्टाची कामे, चार वर्षांनंतर पळ काढलेल्या मुलास भेटले देवदूत

ऊसतोडणीला मजूर पुरविण्यासाठी एकाने घेतलेल्या पैशांपोटी दांपत्याला व त्यांच्या मुलाला चार वर्षे कष्टाची कामे करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील अंथरवण पिंपरी येथे समोर आला.

 

यावरून दोघांवर विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. आता १५ वर्षे वय झालेल्या शिवा हनुमंत पवार या मुलाने एके दिवशी शेतात म्हैस चारताना पळ काढून स्वत:ची सुटका करून घेतली. त्याने आसरा घेतलेले लोक मात्र त्याला देवदूतासारखे भेटले आणि त्यांनी दोन वर्षे त्याचा सांभाळही केला.

 

अमोल शिंदे व प्रवीण शिंदे (दोघेही रा. अंथरवण पिंपरी तांडा, ता. बीड) अशी संशयितांची नावे आहेत. या दोघांवर पिंपळनेर पोलिस ठाण्यात बाल संरक्षण कायदा, अॅट्रॉसिटी अशा कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील हनुमंत पवार यांनी अमोल शिंदे व प्रवीण शिंदेकडून ऊसतोडणीसाठी मजूर पुरविण्यासाठी पैशांची उचल घेतली. मात्र, यासाठी पुरविलेले मजूर अर्धवट काम सोडून पळाले. त्यामुळे या दोघांनी हनुमंत व त्यांची पत्नी सीमासह त्यावेळी नऊ वर्षे वयाचा त्यांचा मुलगा शिवा याच्याकडून वेठबिगार म्हणून शेतातील कामे करून घेण्यास सुरवात केली. या मुलाकडून चार वर्षे शेळ्या हाकणे, गोठ्यातील शेण काढणे, म्हशी सांभाळणे अशी कामे करून घेतली.

 

पळ काढला; मिळाले देवदूत

 

दोन वर्षांपूर्वी शिवा सांभाळत असलेली जनावरे दुसऱ्याच्या शेतात गेली. अमोल व प्रवीण शिंदे मारतील या भीतीने त्याने पळ काढला. बीड परिसरातील पालीजवळील डोंगरात असलेल्या घरात त्याने आसरा मागितला. गंगाराम आणि बाळू साळुजी गवळी या बंधूंनी त्याला जेवण देत आई-वडिलांबद्दल विचारणा केली. मात्र, शिवाला त्यांची नावेही सांगता येत नव्हती. दोन वर्षे गवळी बंधूंनी त्याचा चांगला सांभाळ केल्याचे शिवा पवारने दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

 

दांपत्याचाही छळ

 

सीमा व हनुमंत पवार या दांपत्याला नऊ मुले असून, यातील एकाचा मृत्यू झालेला आहे. उचल घेतलेल्या पैशांसाठी आमचाही अतोनात छळ केल्याचे सीमा व हनुमंत पवार यांनी सांगितले. संबंधितांनी चार वर्षे ऊसतोडणी, शेतातील कामे करून घेतली. नंतर पळ काढला

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -