Monday, November 24, 2025
Homeक्रीडावैभव सूर्यवंशी 14 वर्षांचा आहे की नाही? टीम इंडियाच्या फलंदाज थेट बोलला...

वैभव सूर्यवंशी 14 वर्षांचा आहे की नाही? टीम इंडियाच्या फलंदाज थेट बोलला की…

वैभव सूर्यवंशीने कमी आणि अल्पवधीच क्रिकेट विश्वात नावलौकीक मिळवला आहे. त्याच्या नावाची चर्चा आता क्रिकेट विश्वात होत आहे. भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आहे. त्याने कमी वयातच काही विक्रम आपल्या नावावर केला आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सकडून खेळला आणि त्याने छाप देखील सोडली. पहिल्या सामन्यात काही खास करू शकला नाही. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने दमदार शतक ठोकलं आणि क्रीडाप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं. त्याने 38 चेंडूत 101 धावांची खेळी केली. आयपीएल कमी वयात शतकी खेळी करणारा फलंदाज ठरला. तसेच आयपीएलमधील दुसरं वेगवान शतक ठरलं. त्यामुळे वैभव सूर्यवंशी लवकरच भारतीय संघात पदार्पण करेल अशी आशा आहे. असं असताना त्याच्यासोबत संघात खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या अनुभवी नितीश राणाने त्याच्याबाबत एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्याच्या वक्तव्याची आता चर्चा होत आहे.

 

दिल्ली प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत नितीश राणाच्या नेतृत्वात वेस्ट दिल्ली लायन्स जेतेपद मिळवलं. या विजयानंतर अँकरने त्याला मुलाखतीत काही प्रश्न विचारले. नितीशने एक रॅपिड फायर राउंड खेळला. त्याला वैभव आणि संजू सॅमसनबद्दल प्रश्न विचारण्यात आले. अँकरने विचारलं की राजस्थान रॉयल्सच्या आपल्या सहकाऱ्यांबाबत अशी काही गोष्ट सांगा की ती लोकांना माहिती नाही. वैभव सूर्यवंशीबाबत त्याने मजेशीर अंदाजात सांगितलं की, ‘तो 14 वर्षांचा आहे की नाही.’ त्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनबद्दल एका गोष्टीबद्दल नितीशला विचारण्यात आली की जी कोणालाही माहिती नाही. यावर नितीश राणा म्हणाला, “तो पुढच्या वर्षी कुठे खेळणार आहे.”

 

आयपीएल 2025 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीच्या वयाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. त्याने आयपीएलमध्ये पदार्पणाचा सामना खेळण्यापूर्वी 14 वर्षे पूर्ण केली होती. दरम्यान, वैभव सूर्यवंशीच्या वयाचा वाद पेटला असताना त्याच्या वडिलांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं. बीसीसीआयने वैभव सूर्यवंशीची बोन टेस्ट केली आहे. वैभव सूर्यवंशीच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘जेव्हा साडे आठ वर्षांचा होता. तेव्हा त्याने बीसीसीआयला पहिल्यांदा बोन टेस्ट दिली होती. आम्हाला कोणतीच भिती नाही. तो पुन्हा एकदा वयाच्या तपासणीत जाऊ शकतो.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -