Saturday, September 6, 2025
Homeमहाराष्ट्रमराठी ‘बिग बॉस सीजन 6’ला मोठे ग्रहण, प्रेक्षकांचा हिरमोड होणार? पाच महिन्याच्या...

मराठी ‘बिग बॉस सीजन 6’ला मोठे ग्रहण, प्रेक्षकांचा हिरमोड होणार? पाच महिन्याच्या निर्णयामुळे निर्माते…

बिग बॉस सीजन 19 ला धमाक्यात सुरूवात झाली आहे. काही नवीन चेहरे हे बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहेत. ज्यांच्या नावाची अगोदर कधी चर्चा देखील नव्हती, असे सेलिब्रिटी दिसत आहेत. मोठे वाद देखील होताना दिसले आहेत. बिग बॉस हिंदीचे मागचे दोन सीजन फेल गेले. हे सीजन हीट करण्यासाठी निर्मात्यांकडून प्रयत्न केली जात आहेत. काही रिपोर्टनुसार, बिग बॉसचे ही 19 वे सीजन तीन महिने नाही तर 5 महिने चालणार आहे. यामुळे प्रेक्षकांना तब्बल पाच महिन्यांचा मनोरंजनाचा तडका मिळणार आहे. सलमान खान हाच या सीजनला होस्ट करत आहे. सलमान खानने विकेंडच्या वारमध्ये घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास लावला.

 

बिग बॉस 19 चे सीजन 5 महिने चालणार असल्याचे कळाल्याने मराठी प्रेक्षकांचा हिरमोड झालाय. कारण बिग बॉस हिंदी संपल्यावर लगेचच किंवा हिंदीचे सीजन संपण्याच्या चार दोन दिवस अगोदर मराठी बिग बॉसला सुरूवात होते. मात्र, हे सीजन जर पाच महिने चालणार असेल तर मराठी बिग बॉस सीजन 6 प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार हा प्रश्न प्रेक्षकांकडून उपस्थित केला जात आहे. बिग बॉस मराठी सीजन 5 ने मोठा धमाका केला होता.

 

विशेष म्हणजे बिग बॉस मराठी 5 हे टीआरपीमध्येही धमाल करताना दिसले. पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा बिग बॉस मराठीला होस्ट करताना दिसला. विशेष म्हणजे प्रेक्षकांंना रितेश देशमुख हा ज्याप्रकारे घरातील सदस्यांसोबत वागत होता आणि विकेंडच्या वारमध्ये क्लास लावत होता, हे प्रचंड आवडले. बिग बॉस मराठी सीजन 5 ने अनेक रेकॉर्ड ब्रेक केली आहेत. चाहते मराठी बिग बॉसची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

महेश मांजरेकर की रितेश देशमुख या दोघांपैकी मराठी बिग बॉसला कोण होस्ट करणार याबद्दलही प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता बघायला मिळत आहे. मात्र, याबद्दल अजून खुलासा हा होऊ शकला नाहीये. वर्षा उसगावकर, निक्की तांबोळी, धनंजय पवार, अभिजीत सावंत, पंढरीनाथ कांबळे, सूरज चव्हाण यासारखे कलाकार बिग बॉस मराठीच्या घरात दाखल झाले होते. आता यंदा बिग बॉस मराठीच्या घरात कोण कोण स्पर्धेक दाखल होतात, याकडे चाहत्यांच्या नजरा आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -