Saturday, September 6, 2025
Homeक्रीडाआशिया कप स्पर्धेपूर्वी आणखी एका भारतीय दिग्गज क्रिकेटपटूची निवृत्ती

आशिया कप स्पर्धेपूर्वी आणखी एका भारतीय दिग्गज क्रिकेटपटूची निवृत्ती

भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीचा धडाका सुरु असल्याचं दिसत आहे. आता फिरकीपटू अमित मिश्राने क्रिकेटला रामराम ठोकला आहे. आपल्या फिरकीच्या तालावर भल्याभल्यांना क्रिकेटपटूंना नाचवणाऱ्या अमित मिश्राने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. 4 सप्टेंबर 2025 रोजी त्याने क्रिकेटला रामराम केल्याचं जाहीर केलं. अमित मिश्रा गेल्या काही काळापासून क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी धडपड करत होता. मात्र त्याला काही संधी मिळाली नाही. भारतीय टीम आणि आयपीएल स्पर्धेत दीर्घ काळापासून खेळत नव्हता. त्यात देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याचा विचार केला जात नव्हता. असं सर्व घडत असताना अमित मिश्राने अखेर निवृत्ती जाहीर केली आहे. अमित मिश्राने भारतासाठी 22 कसोटी, 36 वनडे आणि 10 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हरभजन आणि अनिल कुंबळे या जोडीमुळे त्याला फार काही संधी मिळाली नाही. पण अमित मिश्राने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये आपल्या फिरकीची जादू मात्र दाखवली.

 

“क्रिकेटमधील ही 25 वर्षे माझ्यासाठी खूप संस्मरणीय राहिली आहेत. मी बीसीसीआय, प्रशासन, हरियाणा असोसिएशन, सपोर्ट स्टाफ, माझे सहकारी खेळाडू आणि कुटुंब यांचे मनापासून आभार मानतो. चाहत्यांचे अतूट प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार मानतो, ज्यामुळे माझा प्रवास अधिक खास झाला. क्रिकेटने मला असंख्य आठवणी आणि अमूल्य धडे दिले आहेत आणि मैदानावर घालवलेला प्रत्येक क्षण ही एक आठवण बनली आहे जी मी आयुष्यभर जपून ठेवेन.”, असं अमित मिश्राने याने आयएनएस या वृत्तसंस्थेला सांगितले. अमित मिश्राची क्रिकेट कारकिर्द ही सचिन तेंडुलकरपेक्षा अधिक राहिली. सचिनने 24 वर्षे क्रिकेटचा प्रवास अनुभवला. तर अमित मिश्राने 25 वर्षांची क्रिकेट कारकिर्द अनुभवली.

 

अमित मिश्राने देशांतर्गत क्रिकेटमध्ये बरंच नाव कमावलं. त्याने 152 फर्स्ट क्लास सामन्यात 535 विकेट घेतल्या. लिस्ट एमध्ये त्याने 252 आणि टी20 285 विकेट घेतल्या. विशेष म्हणजे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकलं असून 4176 धावा आहेत. इतकंच काय तर भारतासाठी 22 कसोटी सामन्यात 76 विकेट, 36 वनडे सामन्यात 64 विकेट आणि टी20 सामन्यात 16 गडी बाद केले. आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये अमित मिश्राने तीन वेळा पाच विकेट घेण्याचा मान मिळवला आहे. आपल्या क्रिकेट कारकि‍र्दीत त्याने 1072 विकेट घेतल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -