Saturday, September 6, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूरात खून; रिक्षाचालकाचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडला…

कोल्हापूरात खून; रिक्षाचालकाचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडला…

हनुमान नगर, पाचगाव रोड परिसरात आज (दि. ४) सकाळी एक भीषण खुनाची(Murder) घटना समोर आली. रिक्षाचालक मोहन पोवार याचा गळा चिरलेला आणि अर्धवट जळलेला मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अद्याप खुनामागचे कारण स्पष्ट झालेलं नाही.घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला.

 

पंचनामा सुरू असून गुन्हे शाखेचे अधिकारी तपासात सहभागी झाले आहेत.सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरु असून, प्राथमिक चौकशीतून काही ठोस धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पाचगाव रोड परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थानिक नागरिक आणि रिक्षाचालक यांच्यात खळबळ उडाली आहे.नागरिकांनी शांती राखावी, पोलिस सखोल तपास करत आहेत आणि लवकरात लवकर तपशील समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे(Murder).

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -