भारताचा माजी क्रिकेटर शिखर धवन यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये. बेकायदेशीर बेटिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गुरुवारी शिखर धवनची तब्बल आठ तास चौकशी केली. शिखर धवन हा सकाळी 11 च्या सुमारास दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात दाखल झाला होता. तिथे त्याची तब्बल आठ तास चाैकशी करण्यात आली. संध्याकाळी 7 च्या सुमारास शिखर हा ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडताना दिसला. फक्त शिखर धवन हाच नाही तर सुरेश रैना हा देखील ईडीच्या रडारावर आहे. आता हे स्पष्ट झालंय की, शिखर धवन याच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झालीये. क्रिकेटवर गंभीर आरोप करण्यात आली.
13 बेट नावाच्या बेकायदेशीर बेटिंग अॅपचे प्रकरण क्रिकेटरला भोवताना दिसत आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पीएमएलए त्याचा जबाब नोंदवला असल्याचे सांगितले जात आहे. काही जाहिरातींच्या माध्यमातून शिखर धवन हा अॅपशी जोडला गेलाय. ईडीच्या अधिकाऱ्यांनी चाैकशीत या संबंधित अॅपबद्दल त्याला प्रश्न विचारले आणि तो नेमका या अॅपसोबत कसा जोडला गेल्या, याची माहिती त्याच्याकडून घेण्यात आली.
अनेक लोकांची आणि गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप या कंपनीवर आहे. यासोबतच या कंपनीने मोठा कर देखील चुकवला आहे. हेच नाही तर याप्रकरणी माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याची देखील चाैकशी करण्यात आलीये. केंद्र सरकारने ऑनलाईन गेम कंपनींबद्दल काही दिवसांपूर्वीच मोठा निर्णय घेतला. त्यामध्येच आता ईडीकडून थेट भारतीय क्रिकेटरची चाैकशी होत असल्याने चांगलीच मोठी खळबळ उडाली आहे.
तपास संस्थांचा अंदाज आहे की अशा विविध ऑनलाइन बेटिंग अॅप्सचे सुमारे 22 कोटी भारतीय वापरकर्ते आहेत. यापैकी निम्मे सुमारे 11 कोटी नियमित वापरकर्ते आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतातील ऑनलाइन बेटिंग अॅप्सची बाजारपेठ 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे आणि ती ३० टक्क्यांच्या दराने वाढत आहे. हेच नाही तर या कंपन्यांचे मुख्यालय हे भारतात नसून अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, स्पेन या देशांमध्ये आहे. मात्र, भारतामध्ये या कंपन्या कोट्यावधींची उलाढाल करत आहेत