Saturday, September 6, 2025
Homeब्रेकिंगदुधावर आता GST नाही, मदर डेअरी आणि अमूलचे दूध किती रूपयांनी स्वस्त...

दुधावर आता GST नाही, मदर डेअरी आणि अमूलचे दूध किती रूपयांनी स्वस्त होणार?

दोन दिवसांपूर्वी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला फायदा होत असल्याचे दिसत आहे. सरकारने दूध जीएसटीमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता देशातील लोकप्रिय दूध कंपन्या मदर डेअरी आणि अमूल यांच्या दुधाच्या दरात घट होणार आहे. सध्या दोन्ही कंपन्यांच्या दुधावर 5% जीएसटी आकारण्यात येत होता मात्र आता कोणताही कर आकारला जाणार नाही. त्यामुळे आता दुधाची किंमत किती रुपयांनी कमी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

22 सप्टेंबरपासून दुधाच्या किमतीत बदल होणार आहेत. मात्र दर किती रुपयांनी कमी होतील हे कंपन्यांकडून अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. तज्ज्ञांच्या मते दुधाच्या किमतीत 2 ते 4 रुपयांची कपात होऊ शकते. यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या अमूल आणि मदर डेअरीच्या दुधाच्या किमती किती आहेत आणि त्या किती रूपयांनी कमी होऊ शकतात ते जाणून घेऊयात.

 

अमूल दुधाची सध्याची किंमत

अमूल गोल्ड (फुल क्रीम मिल्क) ची किंमत सध्या 69 रुपये प्रति लिटर आहे. तर अमूल ताजा (टोन्ड मिल्क) ची सध्याची किंमत 57 रुपये लिटर आहे. अमूल टी स्पेशल सध्या 63 रुपये लिटर दराने विकले जात आहे. अमूल म्हशीचे दूध 75 रुपये लिटर आहे. अमूल गाईचे दूध 58 रुपये दराने विकले जात आहे.

 

अमूल दुधाचे नवीन दर काय असू शकतात?

अमूल गोल्ड (फुल क्रीम मिल्क) दुधाची किंमत प्रति लिटर 3.45 रुपयांनी कमी होऊन ते 65 ते 66 रुपये लिटर होण्याची अपेक्षा आहे. अमूल ताजा (टोन्ड मिल्क) 2.85 रुपयांनी स्वस्त होऊन 54 ते 55 रुपयांनी विकले जाण्याची शक्यता आहे. अमूल टी स्पेशल 3.15 रुपयांनी स्वस्त होऊन 59 ते 60 रुपये मिळण्याची शक्यता आहे. अमूलचे म्हशीचे दूध 3.75 रुपयांनी स्वस्त होऊन 71-72 लिटरने मिळण्याची शक्यता आहे. तसेच अमूलचे गायीचे दूध 2.90 रुपयांनी स्वस्त होऊन 56-57 रुपयांनी मिळण्याची शक्यता आहे. होईल असा अंदाज आहे.

 

मदर डेअरीच्या दुधाची सध्याची किंमत

मदर डेअरीच्या फुल क्रीम दुधाची किंमत 69 रुपये प्रति लिटर आहे. मदर डेअरीचे टोन्ड दूध 57 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. मदर डेअरीच्या म्हशीच्या दुधाची किंमत 74 रुपये आहे. मदर डेअरीच्या गायीच्या दुधाची किंमत 59 रुपये प्रति लिटर आहे. डबल टोन्ड दूध 51 रुपये प्रति लिटर आणि टोकन दूध 54 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

 

मदर डेअरीच्या दुधाची नवी किंमत किती असेल?

जीएसटीमुक्त झाल्यानंतर मदर डेअरीचे फुल क्रीम दुधाची किंमत 3.45 रुपयांनी स्वस्त होऊन ते 65-66 रुपये प्रति लिटरने मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच टोन्ड मिल्क 2.85 रुपयांनी स्वस्त होऊन 55 रुपये ते 56 रुपये प्रति लिटरने मिळू शकते. मदर डेअरीचे म्हशीचे दूध 3.7 रुपयांनी स्वस्त होऊन 70 रुपये ते 71 रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. तसेच मदर डेअरीचे गायीचे दूध 2.95 रुपयांनी स्वस्त होऊन 56 रुपये ते 57 रुपये प्रति लिटरने मिळण्याची शक्यता आहे. डबल टोन्ड मिल्क 255 रुपयांनी स्वस्त होऊन 48 रुपये ते 49 रुपये आणि टोकन दूध 2.7 रुपयांनी स्वस्त होऊन 51 ते 52 रुपये प्रति लिटरने मिळण्याची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -