Saturday, September 6, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात आईच्या मांडीवरच दहा वर्षांच्या बालकाने सोडला प्राण..

कोल्हापुरात आईच्या मांडीवरच दहा वर्षांच्या बालकाने सोडला प्राण..

कोल्हापूरच्या कोडोली गावात अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. एका दहा वर्षांच्या मुलाने आपल्या आईच्या(mother) मांडीवर अखेरचा श्वास घेतला आहे. अतिशय हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे.एका निरागस मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने अंत झाला. अवघ्या दहा वर्षांच्या चिमुकल्याने खेळता-खेळता आईच्या मांडीवर अखेरचा श्वास घेतला. हृदय पिळवटून टाकणार्‍या या घटनेने गाव सुन्न झाले असून, श्रावण अजित गावडे असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे

 

कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोलीतील आनंदनगर वसाहतीतील शिवनेरी गल्लीमध्ये राहणार्‍या गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. बुधवारी रात्री श्रावण आपल्या मित्रांसोबत गणेश मंडळाच्या शेडमध्ये खेळत होता. नेहमीप्रमाणे तो हसत-खेळत बागडत होता; पण नियतीच्या मनात वेगळेच होते. अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. खेळ सोडून तो धावत आपल्या घराकडे गेला आणि थेट आईच्या कुशीत विसावला. आईच्या मांडीवर डोके टेकवत असतानाच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ज्या मांडीवर त्याला सुरक्षित वाटत होते, त्याच मांडीवर त्याने डोळे मिटले

 

आईने(mother) फोडलेला हंबरडा आणि तिची आर्त किंकाळी ऐकून सगळ्यांचे हृदय हेलावले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण डॉक्टरांनी हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगितले. श्रावण हा इयत्ता चौथीमध्ये शिकत होता आणि तो कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता. चार वर्षांपूर्वीच गावडे कुटुंबाने आपली मुलगी गमावली होती.

 

 

 

बालपणात हृदयरोग खूपच दुर्मिळ असतात. तरीही या प्रकरणांमध्ये अचानक हृदयविकार बंद पडणे (हृदयाचे ठोके अचानक थांबणे) होत आहे. यामागे काही संभाव्य कारणे असू शकतात .काही मुलांना जन्मापासूनच हृदयविकाराच्या समस्या असतात, जसे की हृदयाच्या नसांमध्ये आकुंचन किंवा छिद्रे. हे कधीकधी कोणत्याही लक्षणांशिवाय राहतात आणि अचानक हृदयविकार बंद पडू शकतात.

 

ही एक अनुवांशिक स्थिती आहे ज्यामध्ये हृदयाचे स्नायू असामान्यपणे जाड होतात. यामुळे रक्त प्रवाह थांबतो आणि हृदयाचे ठोके चेतावणीशिवाय थांबू शकतात. अमेरिकेच्या मेयो क्लिनिकनुसार, हे ५०० पैकी १ व्यक्तीला होऊ शकते आणि किशोरवयीन मुलांमध्ये अचानक मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे.कोरोनानंतर, “मल्टीसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम सारख्या आजारांमुळे मुलांमध्ये हृदयाच्या स्नायूंमध्ये जळजळ आढळून आली आहे. याचा हृदयावर परिणाम होऊ शकतो आणि हृदय अपयश येऊ शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -