Saturday, September 6, 2025
Homeकोल्हापूरमित्राच्या खूनप्रकरणी वृद्धाला पाच दिवसांची पोलिस कोठडी

मित्राच्या खूनप्रकरणी वृद्धाला पाच दिवसांची पोलिस कोठडी

पाचगाव रस्त्यावर हनुमाननगर येथील वयोवृद्ध रिक्षाचालक मोहन सूर्यकांत पोवार (73) खूनप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केलेल्या चंद्रकांत केदारी शेळके (73, मोहिते मळा, देवकर पाणंद, कोल्हापूर) याला न्यायालयाने शुक्रवारी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

 

चेष्टामस्करीतून झालेल्या वादावादीतून संशयित शेळके याने एकेकाळचा जिवलग मित्र मोहन पोवार यांच्या गळ्यांवर धारदार सुरीने सपासप वार करून त्यांचा अमानुष खून केला. गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला होता. खुनाच्या घटनेनंतर पळून जाताना समईला धक्का लागून खोलीतील साहित्याला आग लागली होती. देवघरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते.

 

खुनाच्या घटनेपूर्वी पोवार व शेळके यांच्यात झटापट झाली. त्यांनतर संशयिताने मोहन पोवारच्या गळ्यावर सुरीने हल्ला केला. वर्मी हल्ल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहन पोवार यांचा तडफडून मृत्यू झाला. धारदार शस्त्राने वार केल्याने रक्ताच्या चिळकांड्या शेळकेच्या अंगावरील कपड्यावर उडाल्या होत्या. रक्ताळलेले कपडे शेळके याने हनुमाननगर परिसरातील ओढ्यात फेकून दिल्याचे निष्पन्न झाले. पोवार यांच्या घरातून रक्ताचे डाग असलेला सुरा हस्तगत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -